Jalgaon Municipality News: जळगाव महापालिकेमधील अधिकारी-कर्मचारी बदल्या; प्रशासकीय कार्यकाळात प्रथम मोठे फेरबदल

police Transfers
police Transfersesakal
Updated on

Jalgaon Municipality News: महापालिकेच्या १९ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. १) दिले. प्रशासकीय कार्यकाळात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात बदल झाले. (Transfer of officers and employees in Jalgaon Municipal Corporation news)

पदभार बदलण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी असे : सुनील गोराणे यांच्याकडे नगरसचिवपदाचा कार्यभार कायम ठेवून कार्यालय अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. उपायुक्तांचे स्वीय सहाय्यक दीपक फुलमोगरे यांना आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकांची जबाबदारी सोपविण्यात आली.

प्रभाग तीनचे प्रभाग अधिकारी लक्ष्मण सपकाळे यांची महिला व बालकल्याण अधीक्षकपदी बदली करण्यात आली. त्यांच्याकडे आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिकाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. सतीश शुक्ला यांना प्रभाग समिती तीनचे प्रभाग अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.

त्यांच्याकडे विद्युत विभागाचा अतिरिक्त कार्यभार कायम आहे. लेखा विभागातील भाऊसाहेब बागूल, सुजीत चौधरी यांची आस्थापना विभागात बदली करण्यात आली असून, आस्थापना विभागातील राहुल सुशीर यांची लेखा विभागात बदली करण्यात आली.

police Transfers
Jayant Patil: जिल्ह्यातील तीनही मंत्री अपयशी ठरल्याने मुख्यमंत्र्यांनी द्यावे शेतकऱ्यांकडे लक्ष : जयंत पाटील

मनोहर दाभाडे यांची किरकोळ वसुली विभागातून लेखा विभागात, योगेश कोळी यांची आयुक्त कार्यालयातून उपायुक्त कार्यालयात, सुशील बोरसे यांची आयुक्त कार्यालयातून उपायुक्त कार्यालयात, शेख फहीम यांची नगरसचिव कार्यालयातून लेखा विभागात, संतोष सपकाळे यांची उपायुक्त कार्यालयातून सहाय्यक आयुक्त कार्यालयात, जया केदार यांची बारनिशी विभागातून आस्थापना विभागात, नलू दंदी यांची किरकोळ वसुली विभागातून विवाह नोंदणी विभागात, चंद्रशेखर जोशी यांची बांधकाम विभागातून बारनिशी विभागात, विजया हटकर यांची विवाह नोंदणी विभागातून आस्थापना विभागात बदली करण्यात आली.

भोजराज काकडे यांना प्रभाग समिती एकप्रमाणे किरकोळ वसुलीत अतिरिक्त कार्यभार, तर राजू कोळी यांना कार्यालय प्रमुखाचा कार्यभार सांभाळून अभिलेखा विभागातील अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागेल.

police Transfers
Jalgaon News : 2 वर्षांत 67 प्रेमीयुगल झाले भुर्रर्र...! वाढत्या घटनांमुळे पालक चिंताग्रस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.