Jalgaon News : ‘एलसीबी’च्या मनसबदारीसाठी मातब्बरांची फिल्डींग; पोलिस अधीक्षकांच्या बदलीनंतर हालचाली

जिल्हा पोलिसदलाच्या पाठीचा कणा असलेली स्थानिक गुन्हेशाखेच्या निरीक्षक पदावर वर्णी लागण्यासाठी प्रत्येकवेळी असंख्य प्रतिस्पर्धींना पछाडून जो, उरतो तोच या ‘हॉट सीट’चा मानकरी ठरतो.
police (file photo)
police (file photo)esakal
Updated on

Jalgaon News : जिल्हा पोलिसदलाच्या पाठीचा कणा असलेली स्थानिक गुन्हेशाखेच्या निरीक्षक पदावर वर्णी लागण्यासाठी प्रत्येकवेळी असंख्य प्रतिस्पर्धींना पछाडून जो, उरतो तोच या ‘हॉट सीट’चा मानकरी ठरतो. विद्यमान निरीक्षक किशन नजन पाटील मे नंतर निवृत्त होत असून त्यांच्या रिक्त जागेसाठी जिल्ह्यासह बाहेरील निरीक्षकांनी प्रयत्न चालवले आहेत.

मात्र, राजकीय इच्छाशक्ती आणि मंजुरी शिवाय गुन्हेशाखेच्या हॉट-सीटवर सहजासहजी बसणे अशक्य आहे. परिणामी तशी पूर्तता करण्यासाठी इच्छुकांच्या रांगा मंत्र्यांच्या दरबारी लागल्याचे बोलले जात आहे. (transfer of Superintendent of Police competition among officers for LCB increased approaching ministers jalgaon political news)

पदावर वर्णीसाठी स्पर्धा

जळगाव जिल्‍हा पोलिसदलाची गुन्हेशाखेसाठी प्रत्येक दोन-तीन वर्षानंतर कसोटीची स्पर्धा पोलिस निरीक्षकांमध्ये असते. पोलिस अधीक्षक पदानंतर संपूर्ण जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेली ही महत्त्वाची शाखा असल्याने वाट्टेल ते, करण्यासाठी इच्छुकांचे प्रयत्न असतात.

संपूर्ण जिल्ह्याचे नियंत्रण, आणि कर्तबगारी गाजवण्याची एकमेव जागा गुन्हे शाखाच असल्याने आयुष्यात एकदा तरी गुन्हे शाखेचा ‘इन्चार्ज’ व्हावे असे प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याचे स्वप्न असते. ही पोस्टिंग मिळवण्यासाठी वाट्टेल ती मरमर करा, वेळ प्रसंगी राजकीय मर्जी सांभाळून आणि गरज पडलीच तर पैसा मोजून जागा मिळवण्यात येते.

अनेकांची चर्चा.. पण; हिरे अव्वल

स्थानिक गुन्हेशाखेसाठी गेल्या सहा महिन्यांपसून फिल्डींग लावली जात आहे. त्यात एमआयडीसीचे निरीक्षक बबन अव्हाड, जामनेरचे निरीक्षक किरण शिंदे या दोघांनीही राजकीय वरदहस्त मिळविण्याचा प्रयत्न केला. शिंदे जामनेरला तसे खूष आहेत. पण, जास्तीचे कुणाला नको म्हणून त्यांनीही प्रयत्न करून पाहिलेत.

तर, गुन्हेशाखेसाठी प्रचंड महत्त्वाकांक्षा ठेवून जयपाल हिरे यांनी मजबूत फिल्डींग लावत सर्वांना मागे सारल्याचे मानले जात आहे. वरिष्ठ निरीक्षक प्रदीप ठाकूर यांचीही गुन्हेशाखेसाठी प्रबळ दावेदारी मानली जात आहे.

police (file photo)
Jalgaon News : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची चाळीसगावला भेट

नजन-पाटलांच्या प्रमोशनची चर्चा

विद्यमान गुन्हेशाखा प्रभारी किशन नजन पाटील यांच्या संपूर्ण बॅचमधील अधिकाऱ्यांचे डीवायएसपी पदाचे प्रमोशन गेल्या वर्षीच झाले. मात्र, नजन पाटील यांच्याविरुद्ध न्यायालयीन खटला सुरु असल्याने त्यांची पदोन्नती रखडल्याने त्यांचा गुन्हेशाखेचा मुक्काम वाढला होता.

नजन पाटील यांच्या निवृत्तीपर्यंत वाट न बघता आता त्यांच्या पदोन्नतीसाठीही काहींनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे. पदोन्नतीची ऑर्डर येताच तडकाफडकी त्यांच्या जागी आपली वर्णी लागेल अशी फिल्डींग लावल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे.

गुन्हेशाखेला लागलीय नजर..

जळगाव पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला वर्ष-२०१० पासूनच जणू नजर लागलीय.. निरीक्षक अनिल आकडे आणि डी.डी.गवारे यांच्या स्पर्धेत गवारेंनी बाजी मारली. तर, आकडेंना दुय्यम निरीक्षक पदावर बाजूला सारले गेले.

नंतर त्यांनी, विशेष शाखेत बदली करवून घेतली. गवारेंचा कार्यकाळ प्रचंड गाजला.. गुन्हेशाखेने नाशिक रेंजमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. तसाच कार्यकाळ प्रभाकर रायते यांचा गाजत असताना निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणाने पोलिस दलास पोळून काढले. अन् तेव्हापासूनच गुन्हेशाखेला नजर लागल्याची परिस्थिती आहे.

police (file photo)
Jalgaon News : पाडळसरेचे काम 2025 पर्यंत पूर्ण होणारच : उपमुख्यमंत्री अजित पवार

चंदेल, कुऱ्हाडे.. मालिका

‘डॅमेज कंट्रोल’ची क्षमता केवळ राजेशसिंह चंदेल यांच्यात असल्याने ‘विना तिकीट’ त्यांची वर्णी लागली. तदनंतर सुनील कुऱ्हाडे यांनी बाजी मारली.

कुराडेंचा कार्यकाळ बरा राहिला पण, बीएचआरच्या तपासात त्यांच्यावर शिंतोडे उडाले. मग, पुन्हा प्रतिमा राखण्यासाठी बापू रोहम 'विना तिकीट' बसविले गेले. कोरोना काळही त्यांनी गाजवून सोडला.

बकालेंमुळे ‘बट्टा’

सर्वांत महागडा पोलिस निरीक्षक म्हणून अभियंता असलेले किरणकुमार बकाले यांनी जगा पटकावली.. त्यांचाही कार्यकाळ अनेक गुन्ह्यांसाठी गाजला मात्र, वादग्रस्त वक्तव्याने त्यांची दोन महिने शिल्लक असताना दांडी उडवली.

बकाले यांच्यानंतर किशन नजन पाटील यांना संधी मिळू नये यासाठी अनेकांच्या कुरघोड्या सुरु झाल्या..आता त्यांच्या रवानगीसाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहे.

police (file photo)
Jalgaon Municipality News : महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त जाहीर करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.