महापालिका प्रशासनाचे बदल्यांमागील ‘राज’ अन् ‘कारण’!

महापालिका; काही बदल्या कर वसुलीसाठी, काहींना मात्र वेगळी किनार
 transfers of municipal administration tax recovery dhule
transfers of municipal administration tax recovery dhulesakal
Updated on

धुळे : मार्चअखेर जास्तीत जास्त मालमत्ता कर, पाणीपट्टी वसूल व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी पथके नियुक्त केली खरी पण या पथकांमार्फत अपेक्षित वसुली होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता प्रशासनाने पूर्वी मालमत्ता विभागात कार्यरत दोघा-तिघा लिपिकांची पुन्हा मालमत्ता कर विभागात बदली करून शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या बदली प्रक्रियेत आस्थापना विभागाच्या कार्यालयीन अधीक्षकांचीही बदली केली आहे. त्यांच्या बदलीमागे मात्र काही वेगळे कारण असल्याचे सांगितले जाते. एकूणच महापालिकेतील बदल्यांमागील ‘राज’कारणांची नेहमीच चर्चा असते, ती यानिमित्ताने पुन्हा सुरू आहे.

महापालिकेतील विविध विभागांमध्ये अधिकारी-कर्मचारी वर्षानुवर्षे त्याच विभागात व एकाच टेबलवर ठाण मांडून बसल्याने या अधिकारी-कर्मचाऱ्यांची त्या-त्या विभागात एकाधिकारशाही झाल्याचे व त्यामुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्याच्या तक्रारी वारंवार होतात. त्यामुळे अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करा, अशी मागणी नगरसेवक अनेकदा करतात. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत सदस्य अमोल मासुळे यांनी अंतर्गत बदल्यांचा प्रश्‍न मांडून कार्यवाही झाली नसल्याचा आरोप केला व बदलीची मागणी झाल्यानंतर बोळवण म्हणून तत्कालीन आयुक्त अजीज शेख यांनी कंत्राटी कर्मचारी व शिपायांच्या बदल्या केल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. दरम्यान, गुरुवारी (ता.३) प्रशासनाने पाच कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर काढली. या ऑर्डरच्या अनुषंगाने महापालिकेत सध्या तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

शंभर टक्के वसुलीसाठी

मालमत्ता कर, पाणीपट्टी थकबाकी वसुली अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. वारंवार सूचना देऊनही वसुली निरीक्षक व लिपिक यांच्या कामात प्रगती दिसून येत नाही. शंभर टक्के वसुलीसाठी मालमत्ता लिपिकांना दररोज एक लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे कारण देत प्रशासनाने पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली ऑर्डर काढली आहे. यातील दोन लिपिक पूर्वी मालमत्ता कर विभागातच होते, त्यांना पुन्हा ही जबाबदारी देण्यात आली आली आहे.

त्या बदलीची मात्र चर्चा

आस्थापना विभागाचे प्रभारी कार्यालयीन अधीक्षक रमझान अन्सारी यांचाही या बदल्यांच्या ऑर्डरमध्ये समावेश आहे. श्री. अन्सारी यांची बाजार विभागात बदली केली आहे. एका प्रकरणात त्यांची चौकशी सुरू असून या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांची बदली झाल्याचे सांगितले जाते. याच बदलीची सध्या महापालिकेत जोरदार चर्चा आहे. आस्थापना विभाग यापूर्वीही विविध तक्रारी, आरोपांनी चर्चेत राहिला आहे. पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने महापालिकेच्या इतर विभागात पुन्हा चर्चा रंगली आहे. या बदलीनंतर पुढे काय होणार याचीही उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()