Jalgaon Crime News : औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्याच्या मागील परिसरात ढोर बाजाराजवळ असलेल्या ट्रान्सपोर्टवरील चालकांच्या आराम कक्षात झोपण्यासाठी गेलेल्या एका चालकाचा खून झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर चोविस तासांतच खुनाचा उलगडा झाला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
सागर रमेश पालवे (वय २५, रा. मालदाभाडी, ता. जामनेर) असे मृत युवकाचे नाव असून, तो विकास लकडे यांच्या विदर्भ ट्रान्सपोर्टमध्ये चालक म्हणून कामाला होता. शुक्रवारी (ता. ८) सकाळी त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. (Truck driver killed on suspicion of love affair jalgaon crime news)
एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ धाव घेत माहिती घेतली. त्यात, गुरुवारी (ता. ७) परिसरातील नवीन गुरांच्या बाजाराजवळ त्याचा काही लोकांसोबत वाद झाल्याचे कळाले. हाच धाका पकडत पोलिसांनी तपासाला सुरवात केली.
आई ते, मला मारताय..!
सागरच्या आईने आदल्या दिवशीही सागरला फोन केला असता, त्याने ज्ञानेश्वर बोदडे व निलेश गुळवे हे दोघे भांडण करुन मारायला आल्याचे सांगीतले होते. त्यावर त्याच्या आईने त्याला मालकांना फोन करुन घटना सांगण्याचा सल्ला दिला.
तर, दुसऱ्या दिवशी आईने फोन केला, तेव्हा निलेश नामक व्यक्तीने तो झोपला असल्याचे सांगितले. तर, दुपारी बाराच्या सुमारास ट्रान्स्पोर्ट मालक विकास लगडे यांनी सागरच्या आईंना फोन करुन, तुमच्या मुलास वांत्या होत असून, लवकर दवाखान्यात या असे सांगितले. त्यावर त्याची आई जळगावच्या दिशेने निघाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
प्रेम संबधाचा संशय
मृत सागर हा एका मुलीसोबत सतत बोलत असे. याच रागातून त्याच्यासोबत काम करणारे ज्ञानेश्वर ऊर्फ पिंटू ब्रिजलाल बोदडे (वय ४०, रा. अष्टमी कॉलनी, मुक्ताईनगर) व निलेश रोहिदास गुळवे (वय २२, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्याशी वाद झाला. घटनेच्या रात्री याच दोघांनी सागरला बेदम मारहाण करून, त्यात सागरचा मृत्यू झाल्याने दोघांनी पळ काढला.
त्याच्या अंगावरील मारहाणीच्या जखमा आणि रक्त निघत असल्याने त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषीत केले. सागरची आई निलम पालवे यांनी जळगावी पोचल्यावर सागरचा मृतदेह दिसताच हंबरडा फोडत आक्रोश केला.
गुन्हा दाखल
ट्रान्सपोर्ट मालकाने सागरच्या आईला दिलेल्या माहितीनुसार तो एका मुलीसोबत बोलत असल्याचा राग मनात धरुन दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिस पथकाने ज्ञानेश्वर व निलेश या दोघांना अटक केले असून, न्यायालयाने दोघांना मंगळवार (ता. १२)पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.