Tukaram Beej 2023 : तुकाराम महाराजांच्या जयघोषाने पाचोरा दुमदुमले

Tukaram Beej 2023 celebrated in pachora jalgaon news
Tukaram Beej 2023 celebrated in pachora jalgaon newsesakal
Updated on

पाचोरा (जि. जळगाव) : येथे तुकाराम महाराज बीज (Tukaram Beej 2023) उत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या रथ मिरवणुकीसह विविध कार्यक्रमात करण्यात आलेल्या तुकाराम महाराजांच्या जयघोषाने पाचोरा अक्षरशः दुमदुमले. (Tukaram Beej 2023 celebrated in pachora jalgaon news)

कृष्णापुरी भागातील तुकाराम महाराज बीज उत्सव समितीच्यावतीने तुकाराम बीजनिमित्ताने प्रतिमापूजन, महाआरती, रथ मिरवणूक, कीर्तन व महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे गुरुवारी (ता. ९) आयोजन करण्यात आले.

कृष्णापुरी भागातील विठ्ठल मंदिरात सकाळी प्रतिमापूजन, आरती व तुकोबांचा जयघोष करून रथ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीवर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून पूजन करण्यात आले. तुकाराम महाराजांचा जयघोष करण्यात आला.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Tukaram Beej 2023 celebrated in pachora jalgaon news
Cotton Crop Damage : कापसाला नाही भाव, कीटकांचा प्रादुर्भाव; साठवलेल्या कापसामुळे खाजेचे विकार

विठ्ठल मंदिरातच रथ मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर गोविंद महाराज यांचे कीर्तन झाले. महाआरती करून महाप्रसादाने सांगता झाली.

याप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, आर. के. पाटील, बापू पाटील, रमेश शिंदे, विनोद पाटील, विकास पाटील, राजेंद्र पाटील, सुनील पाटील, संजय पाटील, शोभा पाटील, आबा पाटील, मयूर शेलार, अनिल पाटील, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते. या तुकाराम बीज उत्सवात शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येन उपस्थिती दिली.

Tukaram Beej 2023 celebrated in pachora jalgaon news
Gharkul Yojana 2023 : चर्मकार समाजबांधवांचे घरकुलासाठी साकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()