जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर गटामधून निवडून द्यावयाच्या दहा सदस्यांसाठी ६५ उमेदवारी अर्ज वैध ठरले तर १२ अर्ज अवैध ठरले.
११ व १२ जानेवारी ही पदवीधर गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. एकूण ७७ अर्ज दाखल झाले होते. रविवारी (ता.१५) दुपारी प्राप्त अर्जांची छाननी होऊन वैध व अवैध उमेदवारांची यादी सायंकाळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली.(Twelve applications from graduate group declared invalid UMVI Authority Election Sixty Five candidates in competition for ten seats Jalgaon News)
१६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वैध-अवैध उमेदवारी अर्जाबाबत कुलगुरूंकडे अपील दाखल करता येईल. तर १८ जानेवारीस कुलगुरू या अपीलाबाबत निर्णय घेतील.
१९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून २० जानेवारीला निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर होईल.
आणि रविवार दि. २९ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ८ ते सायं. ५ या वेळेत मतदान हाईल. बुधवार दि. १ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
असे अर्ज ठरले वैध
आज छाननीत खुल्या संवर्गात ३३ अर्ज वैध तर ५ अवैध ठरले. इतर मागास संवर्गात १० अर्ज वैध २ अवैध, अनुसुचित जाती संवर्गात सातही अर्ज वैध ठरले. अनुसुचित जमाती संवर्गात ५ वैध तर १ अवैध, महिला संवर्गात ५ वैध व ४ अवैध ठरले. विमुक्त जाती/भटक्या जमाती संवर्गातील पाचही अर्ज वैध ठरले.
विद्यापीठाच्या अधिसभेवर पदवीधरांमधून १० जागा असणार आहेत. त्यामध्ये खुल्या संवर्गातून ५ जागा, अनुसूचित जाती संवर्गातून एक, अनु. जमाती संवर्गातून एक, विमुक्त जाती/भटक्या जमाती संवर्गातून एक, इतर मागासवर्ग संवर्गातून एक आणि महिला संवर्गातून एक जागा राखीव आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.