धुळ्यातील दोन डॉक्टर कारवाईच्या मार्गावर

आधार व मतदारकार्ड आढळल्याने बळावला संशय
 doctor
doctor sakal
Updated on

धुळे : येथील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Corona Vaccination)मोहिमेअंतर्गत बनावट प्रमाणपत्र वितरण घोटाळाप्रकरणी दोन डॉक्टर (doctors) कारवाईच्या मार्गावर असल्याचे संकेत आहेत. त्यातील एका डॉक्टरकडे आधारकार्ड, मतदार कार्ड आढळल्याने त्याच्यावरचा संशय बळावला आहे. तर महापालिकेच्या मच्छीबाजार परिसरातील दवाखानाही (Hospital)बनावट प्रमाणपत्र वितरणाच्या विळख्यात सापडण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे दोन्ही डॉक्टरांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जाते.

 doctor
भारताला काँग्रेस पक्षचं व्हिजन देऊ शकतो - राहुल गांधी

बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळ्याशी निगडित पोलिसांच्या तपासात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घोटाळ्यात मोठे रॅकेट सक्रिय असून संशयितांची यादी दिवसागणिक वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. प्रशांत पाटील, उमेश पाटील, अमोल पाथरे, देवपूरमधील एजंट इम्रान शेख आणि साक्रीरोड परिसरातील एजंट नुमान यांना अटक केली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीमुळे १४ दिवसांसाठी जिल्हा कारागृहात रवानगी झाली आहे. याप्रकरणी पोलिस तपास यंत्रणेने महापालिकेच्या लसीकरण मोहीम अधिकारी डॉ. पल्लवी रवंदळे यांचाही जबाब घेतला आहे. तसेच आरोग्य कर्मचारी ज्योती पुकळेसह अन्य परिचारिका व आशा वर्कर्सचाही जाबजबाब झाला आहे. घोटाळ्याशी थेट संबंध असलेले कथित सामाजिक कार्यकर्ते जावेद, बारी, पठाण यांच्याही मागावर पोलिस यंत्रणा आहे. या पार्श्वभूमीवर तपासात मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलिस ठाण्याच्या तपास यंत्रणेने गुरुवारी (ता.२०) डॉ. सर्फराज अन्सारी आणि महापालिकेच्या मच्छीबाजार परिसरातील नंदीवाडा भागातील दवाखान्यातील डॉ. मसरून शेख यांना चौकशीसाठी बोलावले होते.

 doctor
सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता सुधीर कुमारला बिहार पोलीसांकडून मारहाण

डॉ. अन्सारी यांच्याकडे झालेल्या झडतीत आधार कार्ड, मतदार कार्ड आढळल्याचे सांगितले जात होते. त्यांच्याकडे संबंधित नागरिकांचे आधारकार्ड व मतदार कार्ड असण्यामागचे कारण काय असा प्रश्‍न उपस्थित झाला. या अनुषंगाने पोलिसांनी निवडणूक यंत्रणेशी निगडित बीएलओंना पोलिस ठाण्यात बोलावले. त्यांनी तपास यंत्रणेला सांगितले की, मुस्लिमबहुल भाग दाट वस्तीचा असल्याने संबंधित नागरिकांची घरे सापडवण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व वेगवेगळ्या पक्ष-संघटनाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला जातो व त्यांच्या माध्यमातून मतदार कार्डाचे वाटप केले जाते. संबंधित कार्यकर्ते किंवा प्रतिनिधी नंतर मतदार कार्ड संबंधित नागरिकाला दिल्याची पावती सादर करतात. मात्र, असे असले तरी डॉ. अन्सारी यांच्याकडे संबंधित नागरिकांचे आधार कार्ड आले कसे त्याचा तपास यंत्रणा करत आहे. त्याचप्रमाणे डॉ. शेख यांच्या क्षेत्रात बनावट प्रमाणपत्र वितरित झाल्याचा संशय बळावत चालला आहे. या अनुषंगाने तपास यंत्रणा डॉ. अन्सारी व डॉ. शेख यांची चौकशी करताना त्यातून नेमके काय वास्तव निष्पन्न होते आणि दोघे डॉक्टर काय खुलासा करतात, यावर कारवाईचे भवितव्य अवलंबून असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.