Jalgaon Crime: चिन्या जगताप खून प्रकरणी फरारींपैकी दोघांना अटक; जेलर पेट्रीस गायकवाडसह इतरांचा शोध सुरु

Murder Case
Murder Caseesakal
Updated on

Jalgaon Crime : जळगाव जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रविंद्र जगताप या बंदीवानाचा मृत्यु झाल्याच्या प्रकरणात फरारी असलेल्या आण्णा किसन काकड (वय ५३, रा. पानेवाडी, मनमाड) व अरविंद प्रकाश पाटील (वय ३८, रा. चाळीसगाव) अशा दोघांना तब्बल दोन वर्षांनी जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Two of fugitives arrested in China Jagtap murder case Jailer Patrice Gaikwad and others being hunted Jalgaon Crime)

जिल्हा कारागृहात ११ सप्टेंबर २०२०ला कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांनी मारहाण केल्यानेच चिन्या उर्फ रविंद्र जगतापचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याची पत्नी मीना जगताप यांनी केला होता.

त्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि नशिराबाद पोलीस निरीक्षकांना गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते. त्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्यात तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह ४ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Murder Case
Sangola Crime : प्रेमातून संतप्त झालेल्या प्रियकराने लग्नास नकार दिल्याने केला तरुणीचा खून

कारागृह कायद्यानुसार ही घटना गंभीर असून, पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच्या ४८ तासांच्या आत गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र, तसे झाले नाही. तब्बल १४ महिन्यांनी गुन्हा दाखल झाला होता.

तर पेट्रस गायकवाड याचे निलंबन झालेले आहे. तर आण्णा काकड व अरविंद पाटील हे फरारी होते. त्यांना अटक करण्यात आली असून, एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्य संशयित अधीक्षक गायकवाड, तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी हे अद्यापही फरारी आहेत. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल तपास करीत आहेत.

Murder Case
Kolhapur Crime : सापावर पाय पडल्याच्या भीतीनं इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू; तापानं फणफणतं होतं अंग, CPR मध्ये नेलं पण..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()