Jalgaon Accident News : वाहनावर झाड कोसळून दोन पोलिस ठार

Workers and villagers removing tamarind trees that fell on a police vehicle near the Anjani project canal between Kasoda-Arandol.
Workers and villagers removing tamarind trees that fell on a police vehicle near the Anjani project canal between Kasoda-Arandol. esakal
Updated on

Jalgaon Accident News : जिल्‍हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाच्या वाहनावर भलेमोठे चिंचेचे जिर्ण झाड कोसळून दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

कासोदा-एरंडोल दरम्यान अंजनी प्रकल्पाच्या कालव्याजवळ पावणे नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. (Two policemen were killed due to tree fell on vehicle jalgaon news )

जिल्‍हा आर्थिक गुन्हे शाखेचे तपासपथक शासकीय वाहनाने (एमएच.१९.एम.७५१) कासोद्याकडून एरंडोलकडे येत असताना गुरुवारी(ता.२९) रात्री पावणे नऊच्या दरम्यान भलेमोठे चिंचेचे झाड या पोलिस वाहनावर कोसळले. यात वाहनातील दोघे दाबले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू ओढवला, उर्वरीत तिघे जखमी झाले.

अपघात घडला त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील हे त्यांच्या वाहनाने जवखेडा (ता. एरंडोल) येथे घरी जात होते, मात्र घटना पाहून त्यांनी तत्काळ एरंडोल पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिस निरीक्षक संतोष बारोडे, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. उपनगराध्यक्ष कुणाल महाजन व ग्रामस्थांनी जखमींना तातडीने बाहेर काढून खासगी वाहनाने जळगावला रवाना केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Workers and villagers removing tamarind trees that fell on a police vehicle near the Anjani project canal between Kasoda-Arandol.
Nashik Accident : शेतकऱ्याचा मुलगा ते पोलीस अधिकारी! ही ओळख असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

तिघांची प्रकृती धोक्याबाहेर

पोलिसांच्या वाहनातील सहाय्यक फौजदार भरत जेठवे, नीलेश सूर्यवंशी आणि चंद्रकांत शिंदे अशा तिघांना रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू करण्यात आले असून घटनेचे वृत्त कळताच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्‍हा रूग्णालयात धाव घेत चौकशी केली.

क्रेन लावून काढले मृतदेह

पोलिस वाहनावर पडलेले चिंचेचे झाड प्रचंड वजनी आणि भले मोठे असल्याने त्यात पोलिस वाहनाचा पूर्णतः चुराडा झाला. दोन कर्मचारी दबले गेल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने क्रेन मागवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर मदतकार्य सुरु होते.

Workers and villagers removing tamarind trees that fell on a police vehicle near the Anjani project canal between Kasoda-Arandol.
Jalgaon News : उपचार सुरू असताना कैद्याचा मृत्यू; 15 दिवसातील दुसरी घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.