जळगाव : पाचोरा शहरातील २३ वर्षीय तरुणाचा वाहनाचा कट मारल्यावरून चाकू भोसकून खून केल्याची घटना जानेवारी २०२२ मध्ये घडली होती.
या गुन्ह्यात यापूर्वीच पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून, वर्षभरापासून फरार असलेल्या आणखी तीन संशयितांना गुन्हे शाखेने शनिवारी (ता. २१) वावडदा (ता. जळगाव) येथून अटक केली आहे.
३० जानेवारी २०२२ ला सायंकाळी साडेसहा ते साडेसातला पाचोरा- पुनगाव रोडवरील बुऱ्हानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात तरुणांच्या झालेल्या भांडणात भूषण नाना शेवरे (वय २३, रा. दुर्गानगर, पाचोरा) याचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला होता. (Two suspects in Bhushan Shevare murder arrested number of murder suspects in custody from vavhadga has reached five Jalgaon News)
याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली होती. ३१ जानेवारीला उर्वरित तिघांना अटक करण्यात आली होती.
या गुन्ह्यात लोकेश ऊर्फ विकी श्यामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश ऊर्फ सचिन राजेंद्र चौधरी, सागर प्रकाश पाटील, अविनाश ऊर्फ भद्रा सुरेश पाटील, राहुल ऊर्फ मॉडी पाटील, चेतन ऊर्फ स्टायलेश पाटील आणि पवन (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोनच दिवसांत आठ संशयितांना अटक केली होती. मात्र, संशयितांचे साथीदार वर्षभरापासून फरारी झाले होते.
पाचेारा खुनातील दोन संशयित वावडदा येथे दडून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशन नजन पाटील यांना मिळाली. त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश चोभे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, पोलिस नाईक विजय पाटील, प्रीतम पाटील, सचिन महाजन यांनी रोशन ओंकार साळुंके (रा. शाहू कॉलनी, पाचोरा) आणि तेजस प्रदीप पाटील (जयराम कॉलनी, पाचोरा) यांना अटक केली व पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.