जळगाव : महाराष्ट्र चेंबर व उद्योग विभाग पुरस्कृत राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियानाचा प्रारंभ उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज नाट्यसंकुलात झाला. (Uday Samant statement about Encouragement of women for industry jalgaon news)
मंत्री सामंत यांनी यशस्वी महिला उद्योजकांचे उदाहरण देऊन महिला उत्कृष्ट नियोजन करून व्यापार उद्योग करीत असल्याचे सांगितले. राज्यस्तरीय महिला उद्योजकता अभियानातून राज्यातील महिलांना व्यापार उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
व्यासपीठावर आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियानाच्या प्रकल्पप्रमुख संगीता पाटील उपस्थित होत्या.
सुरवातीला संगीता पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व राज्यस्तरीय महिला उद्योजकता विकास अभियानाची माहिती विशद केली, तसेच महाराष्ट्र चेंबरच्या महिला उद्योजकता विकास समितीच्या कार्याची माहिती दिली.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी उद्योग विभाग पुरस्कृत राज्यात महिला उद्योजकता अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
भुसावळचे आमदार संजय सावकारे व जळगावचे आमदार राजू मामा मुळे यांनीही मार्गदर्शन केले व राज्यस्तरीय महिला उद्योजकता अभियानास शुभेच्छा दिल्या.
स्टार्टअप व इनोव्हेशन या विषयावर प्रीती अग्रवाल व श्रीकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी आभार मानले. भारती काळे, मुनीरा तरवारी, महेंद्र रायसोनी, नितीन रेदासनी, नंदू अडवाणी, श्याम अग्रवाल, रमण जाजू,
चंद्रकांत सतरा, सुनील महाजन, संदीप भोळे, शैलेश काबरा, संजय जैन, संदीप भोळे, परिमल मेहता, विनोद बियाणी, जितेंद्र जैन, सचिन चोरडिया, दिलीप गांधी, दर्शन टाटीया, रामेश्वर मंत्री, अनिल कांकरिया, सुयोग जैन सुनील सुखवाणी, नीलेश कोटेचा, गौरव सपळे, नीलेश अग्रवाल, योगेश भोळे, रुपेश शिंदे, राकेश कंडारे, महिला व महाविद्यालयात विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.