जळगाव : औद्योगिक वसाहतींचे प्रश्न वेगळे आहेत. त्या प्रत्येक प्रश्नावर काम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उद्योगमित्र बैठक नियमित होण्याने बऱ्याच समस्या सुटू शकतात.
त्यामुळे दर आठवड्याला ही बैठक व्हावी, म्हणून अध्यादेश काढू, अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी गुरुवारी (ता. १६) येथे दिली. (uday samant statement about udyogmitra meeting every week jalgaon news)
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चरतर्फे राजे संभाजी नाट्यगृहात झालेल्या जळगाव जिल्हा विकास परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, जैन इरिगेशचे संचालक अतुल जैन, परिषदेच्या प्रोजेक्ट चेअर पर्सन संगीता पाटील, भरत अमळकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी दिशा ठरविणाऱ्या परिषदेत जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषिक्षेत्रातील विकासासंबंधी मंथन झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
नवीन उद्योगांसाठी एक खिडकी योजना
परिषदेत मार्गदर्शन करताना श्री. सामंत म्हणाले, की उद्योजकांना नवीन उद्योग सुरू करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
तसेच प्रत्येक एमआयडीसीत स्वत:चे फायर स्टेशनबरोबरच कामगार रुग्णालय उभारण्यात येईल. जिल्ह्यात केळीपासून धागा व कापडनिर्मिती करणारे उद्योग सुरू करण्याची तयारी काही उद्योजकांनी दर्शविल्याचे ते म्हणाले.
‘जळगाव प्रथम’ हा विचार व्हावा : जैन
जळगावच्या विकासासाठी इथली मंडळी संघटित नाही. आपणच आपल्या विकासविषयक स्थितीला कारणीभूत आहोत. विमानतळ असूनही सेवा नाही. पोटेंशिअल असूनही केवळ व्हीजन नसल्याने जळगावचा विकास होत नाही. यासंदर्भात सर्व समस्या व प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर बैठकीत मांडण्यात येतील, अशी भूमिका जैन इरिगेशनचे संचालक अतुल जैन यांनी परिषदेत मांडली.
प्रारंभी संगीता पाटील यांनी प्रास्ताविकात परिषदेसंदर्भात भूमिका विशद केली. ललित गांधी यांनी चेंबरच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. किरण बच्छाव, श्यामसुंदर अग्रवाल, महेंद्र रायसोनी यांनी उद्योगांसंदर्भात समस्या मांडल्या. परिषदेत महिला उद्योजक विकास अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. आता हे अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.