Uddhav Thackeray : पाचोरा येथे रविवारी उद्धव ठाकरे यांचे हस्ते निर्मल सीड्स इंटरनॅशनल स्कूल व निर्मल प्रयोगशाळेच्या प्रांगणातील स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, तसेच भारतातील दुसऱ्या मायकोरायझा लॅबचे उद्घाटन झाले. त्यानंतर सावा मैदानावर भव्यदिव्य जाहीर सभा झाली. (Uddhav Thackeray public meeting and laboratory inauguration at Pachora jalgaon news)
व्यासपीठावर खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनंत गिते, वैशाली सूर्यवंशी, महानंदा पाटील, संजय सावंत, जीवन कामत, अशोक धात्रक, गुलाबराव वाघ, सुषमा अंधारे, शुभांगी पाटील, वैशाली सूर्यवंशी, कमल पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी खासदार चंद्रकांत खैरे,
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, आमदार अजय चौधरी (मुंबई), आमदार उदयसिंग राजपूत (कन्नड), माजी आमदार डॉ. सतीश पाटील, विजय परब, महेश मिस्तरी, विराज कावडिया, चैतन्य बनसोडे, गुलाबराव वाघ, विष्णू भंगाळे, गजानन मालपुरे, दीपकसिंग राजपूत, गणेश परदेशी, मनोहर चौधरी,
रमेश बाफना, अरुण पाटील, अभय पाटील, उद्धव मराठे, हर्शल पाटील यांच्यासह निर्मल सीड्सचे संचालक, महाविकास आघाडीचे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, आर. ओ. तात्या पाटील, मीनाताई ठाकरे,
महात्मा फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रम सुरू झाला. याप्रसंगी रमेश बाफना, उल्हास आभाळे (पुणतांबा), प्रियंका जोशी (साक्री), शुभांगी पाटील (नाशिक), सुषमा अंधारे, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत, अंबादास दानवे, वैशाली सूर्यवंशी यांची भाषणे झाली. यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविधांगी धोरणांवर टीका केली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नावे घेत भाजपने विरोधकांसह स्वतःच्या पक्षातील कर्तृत्ववान नेतेही संपविले. इतर पक्षात असला म्हणजे भ्रष्ट व भाजपत गेला म्हणजे गोमूत्र शिंपडून तो पवित्र होतो काय, असा प्रश्न उपस्थित करून भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.
अजून भाजपलाच हिंदुत्व काय ते कळालेले नाही. सध्या सरकारला प्रश्न विचारणे, सरकारच्या धोरणांसंबंधित गाणी म्हणणे, हा गुन्हा झाला आहे. शेतकरी व मानवाची व्यथा स्पष्ट करणाऱ्या बहिणाबाई चौधरी आज असत्या तर त्यांनाही या सरकारने तुरुंगात टाकले असते.
लोक मला म्हणतात ‘कोण आला रे कोण आला, गद्दाराचा बाप आला’, पण हे मला मान्य नाही. अशा गद्दारांचा मी बाप नाही. अशी औलाद माझी असूच शकत नाही. बाप चोरणारे इतरांना काय न्याय देणार, असे म्हणत त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
मनसेतर्फे पुतळा दहनाचा प्रयत्न
मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभाजीराजे चौकात सकाळी खासदार संजय राऊत यांच्या पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून पुतळ्यासह मनसेच्या जिल्हाभरातील सुमारे १५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
प्रतिष्ठितांशी साधला संवाद
उद्धव ठाकरे यांचेसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निर्मल सीड्सच्या मायकोरायझा लॅबच्या प्रांगणात शहर व परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधला. या वेळी आर. ओ. तात्या पाटील यांच्या वाटचालीवर आधारित चित्रफीतही दाखविण्यात आली.
या वेळी आर. ओ. तात्यांच्या योगदानाचा गुणगौरव करत ठाकरेंनी शेतकरीहितासाठीच्या विविध योजनांचा ऊहापोह केला. शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय प्रश्न मिटणार नाहीत, असे स्पष्ट केले.
रश्मी ठाकरे पाटील कुटुंबीयांसमवेत
रश्मी ठाकरे या व्यासपीठावर न बसता व्यासपीठासमोर व आर. ओ. पाटील यांच्या पत्नी कमल पाटील व पाटील कुटुंबीयांसह बसल्या.
सभेला खानदेशातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंदोबस्तासाठी पोलिसांची दमछाक झाली. शहराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. वैशाली सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. नाना वाघ यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. अभय पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.