Jalgaon NMU News : जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील ज्येष्ठ नागरिक संघांना आपल्या संघातील सदस्य अथवा परिसरातील ज्येष्ठ नागरिकासांठी समुपदेशकांच्या नि:शुल्क प्रत्यक्ष भेटी आयोजित करावयाच्या आहेत.
त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाकडे प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (UMV senior citizen visit activity in 3 districts jalgaon news)
आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे विद्यापीठ परिक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या कार्यक्रमांमधून ज्येष्ठ नागरिकांमध्ये अनेक समस्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यात एकाकीपणा, नैराश्य, दु:ख, स्मृतिभ्रंश, फसवणूक, आजारपण, नकारात्मकता, अशा विविध बाबींचा समावेश आहे. त्यामुळे या विभागाने ‘समुपदेशक आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या उपक्रमाद्वारे समुपदेशक प्रत्यक्ष भेटीतून ज्येष्ठ नागरिकांचे समुपदेशन करणार आहे. हे समुपदेशन नि:शुल्क राहणार आहे.
जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील ज्या ज्येष्ठ नागरिक संघांना समुपदेशकांच्या भेटीचे आयोजन करावयाचे आहे, त्यांनी पत्राद्वारे किंवा ई-मेलद्वारे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला अर्ज भरून पाठवावयाचा आहे. योग्य त्या प्रस्तावांना मान्यता दिली जाईल, अशी माहिती या विभागाचे संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.