Local Bodies Election : निवडणुकांच्या अनिश्चिततेने वाढली अस्वस्थता!

Election
Electionesakal
Updated on

पाचोरा (जि. जळगाव) : तालुक्यासह मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात अनिश्चितता वाढत असल्याने राजकीय मंडळींसह इच्छुक उमेदवार कमालीचे संभ्रमावस्थेत आहेत.

निवडणुका नेमक्या केव्हा होणार? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न सर्वांकडूनच होत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निवडणुका समोर ठेवून ज्या इच्छुकांनी गेल्या वर्षभरापासून प्रचंड खर्च करून तयारी चालवली आहे. ते मात्र कमालीचे वैतागले आहेत. (Uncertainty of election has increased anxiety Local Bodies Election jalgaon news)

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समितीच्या निवडणुका मोठ्या निवडणुकांचा पाया असल्याने या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांची नेतेमंडळी लक्ष केंद्रित करीत असते. गेल्या वर्षभरापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.

परंतु अजूनपर्यंत निवडणुकांसंदर्भात कोणतीही निश्चितता निदर्शनास येत नाही. पालिका प्रशासक पदाला वर्ष होत आले आहे. पालिकेच्या सर्वच प्रभागात राजकीय पक्ष व अपक्षांनी इच्छुक उमेदवार म्हणून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांना चांगलाच आर्थिक घाव सोसावा लागत आहे.

निवडणुका लांबत असल्याने काही इच्छुकांनी तर हताश होऊन तयारी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती यांच्या निवडणुकांसंदर्भातील आरक्षण सोडत प्रक्रिया या अगोदरच पूर्णत्वास आल्याने लवकर निवडणुका होतील, असे भाकीत केले जात होते.

परंतु ते फोल ठरले आहे. पालिकेच्या निवडणुका नेमक्या जुन्या धोरणानुसार होणार की नव्या धोरणानुसार? याबाबतही निश्चितता नाही. असे असले तरी इच्छुक कामाला लागले होते. परंतु आता तेही हताश होऊन थांबण्याच्या तयारीत आहेत.

Election
Liquid Biopsyला ‘क्रांतिकारी संशोधना’ चे मानांकन! दातार कॅन्‍सर जेनेटिक्‍सला USFDA कडून मिळाला बहुमान

पाचोरा मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे शिवसेना गट, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, भाजप, मनसे, वंचित आघाडी या राजकीय पक्षांनी आपले उमेदवार देण्याचे या अगोदरच जाहीर केले आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी इच्छुक उमेदवारांचा प्रभाव व अस्तित्व वाढवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

आघाडी व युती या संदर्भातील चर्चा रंगत असल्या तरी उमेदवारी आपल्यालाच मिळणार या अपेक्षेतून अनेकांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात तरुणांची ये जा सुरू आहे. बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यापुढे माजी आमदार (कै.) आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या व उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी उभे केलेले आव्हान राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासंदर्भात दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेले समज गैरसमज राजकीय वणवा पेटवणारे ठरले. परंतु सहकार क्षेत्राच्या निवडणुकात राजकारण नसते, मी आमदारांसाठी जिल्हा बँकेची जागा सोडली. त्यांनी त्या वेळेचा शब्द पाळला व दूध संघासाठी माझ्यासाठी माघार घेतली.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Election
Nashik Fire Accident : धावत्या बसने घेतला पेट; सर्व प्रवासी सुखरूप

मी राष्ट्रवादीतच आहे, असे दिलीप वाघ यांनी स्पष्ट केले आहे. भाजपचे अमोल शिंदे हे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आपला प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. मनसे, वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनीही बैठका घेऊन उमेदवारीचे संकेत दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे.

..तर ‘तारीख पे तारीख’

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तारखांकडे सर्वांचेच लक्ष लागून असले तरी न्यायालयीन प्रक्रियेत रखडलेले शिंदे व ठाकरे गटाचे निकाल लागेपर्यंत निवडणुका होणार नाहीत, असा अंदाज राजकीय दिग्गजांकडून व्यक्त होत आहे. परंतु त्या निकालांसंदर्भात देखील ‘तारीख पे तारीख’ सुरू असल्याने संभ्रम वाढीस लागला आहे.

Election
Jindal Fire Accident : चौकशी अहवाल येईपर्यंत जिंदाल पॉलीफिल्म कंपनीचे उत्पादन बंदचे आदेश!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.