Jal Jeevan Mission : जलजीवन योजनेची विहीर कोरडीठाक; शासनाच्या कोट्यवधींचा चुराडा

under jal jeevan mission after drilling well no water in well jalgaon news
under jal jeevan mission after drilling well no water in well jalgaon newsesakal
Updated on

Jal Jeevan Mission : ‘हर घर जल, हर घर नल’ या संकल्पनेसह भारत सरकारने २०२४ पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जल जीवन मिशन सुरू केले. (under jal jeevan mission after drilling well no water in well jalgaon news)

या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी दिले जाणार आहे. जामठी ग्रामपंचायत याला अपवाद ठरत असून, ज्या ठिकाणी कायमस्वरूपी जलस्रोत उपलब्ध होणार नाही, त्याच ठिकाणी ही योजना राबवली जात असून, याला ग्रामस्थांचा विरोध असून, शासनाच्या निधीचा अयोग्य वापर सुरू आहे.

ग्रामीण भागातील पाणीटंचाईची दाहकता कायमस्वरूपी कमी व्हावी, सर्वांना मुबलक पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे. जामठी गावातील शेतकरी समाधान नारायण महाजन यांनी गावाला विहिरीसाठी जागा दान दिली आहे.

२०१३ मध्ये याच जागेवर भारत निर्माण योजनेंतर्गत सुमारे साठ फूट खोल विहिरीचे खोदकाम करण्यात आले. मात्र पुरेसा जलसाठा उपलब्ध न झाल्याने ही योजना तत्कालीन सरपंच व सदस्यांनी गुंडाळून टाकली व तसे पत्रही जिल्हा परिषदेला दिले होते. मात्र सद्यस्थितीत जलजीवन मिशन योजना ही त्याच विहिरीत राबवली जात असून, शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जाणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

under jal jeevan mission after drilling well no water in well jalgaon news
Jalgaon News : खादी ग्रामोद्योगचा बसस्टॉप या ठिकाणी हलविणार; टॉवर चौकातील गर्दी टाळणार

या कामावर सुमारे १ कोटी ५२ लाख ५७ हजार रुपये प्राप्त आहे. विद्यमान सरपंच शांताबाई पाटील यांच्या हस्ते ३० मेस योजनेचे भूमिपूजन झाले आहे. यानंतर हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार साडेसात मीटरपैकी सुमारे १६ फूट काम आतापर्यंत झालेले आहे. पण आतापर्यंत विहिरीला एकही थेंब न लागल्याने ही योजना अयशस्वी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे त्या योजनेचा जलस्रोत बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी आहे.

कायमस्वरूपी जलस्रोत हवा

जामठीकरांना कित्येक वर्षांपासून कायमस्वरुपी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर कायमस्वरूपी जलस्रोत उपलब्ध उपलब्ध करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे पर्यायी जलस्रोतासाठी कापूसवाडी धरण किंवा दहा किलोमीटरवर असलेल्या उर्हा धरणात विहीर खोदून गावात पाणी पोहचू शकते, असा ग्रामस्थांचा विशेष आग्रह असून, मागणी आहे. पाणीप्रश्नी नागरिकांनी ग्रामपंचायतीला चांगलेच धारेवर धरत जाब विचारला आहे.

भूजल सर्वेक्षण समिती अहवालात साशंकता

याच विहिरीत २०१३ मध्ये भारत निर्माण योजना राबवली गेली होती. तत्कालीन सरपंच व पदाधिकारी यांनी ही योजना गुंडाळली होती. इथे कोणत्याही प्रकारचा जलस्रोत उपलब्ध नसल्याचे पत्र वरिष्ठांना दिले होते. मात्र दुसरीकडे भूजल सर्वेक्षण समितीने या विहिरीला मुबलक पाणी लागेल, असा लेखी विश्वास दिला होता. मात्र विहिरीचे आतापर्यंत झालेल्या खोदकामानंतर विहीर कोरडीठाक असल्याने निधी वाया जाणार, हे मात्र निश्चित.

under jal jeevan mission after drilling well no water in well jalgaon news
Jalgaon RTO Office : जळगावात आरटीओ कार्यालय; पालकमंत्र्यांनी पाळला शब्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.