Jalgaon News : वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले

तालुक्यातील आदिवासी भागातील उमर्टी, गौऱ्यापाडा, अमलवाडी, मोरचिडा, सत्रासेन या गावातील आदिवासी बांधवांना अनेक दिवसांपासून वीजपुरवठा मिळत नाही.
Villagers protesting outside the office of the Electricity Board
Villagers protesting outside the office of the Electricity Boardesakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यातील आदिवासी भागातील उमर्टी, गौऱ्यापाडा, अमलवाडी, मोरचिडा, सत्रासेन या गावातील आदिवासी बांधवांना अनेक दिवसांपासून वीजपुरवठा मिळत नाही. या भागातील शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

या संदर्भात वीज मंडळाच्या संबंधित कार्यालयांना लेखी, तोंडी निवेदन देण्यात आले. (Under leadership of NCP Dr Barela officials of electricity board were locked in office jalgaon news)

तरीही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वात ताळेबंद आंदोलन करण्यात येऊन वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना कुलूप लावून कार्यालयातच कोंडून ठेवण्यात आले.

चोपडा शहर स्थित जुना शिरपूर रोडवरील (लासूर फिडर) वीज मंडळाच्या कार्यालयावर बुधवारी (ता.१४) सकाळी अकराला डॉ. बारेला यांच्या नेतृत्वात टाळेबंद आंदोलन करण्यात आले. या वेळी शेकडो आदिवासी बांधव आपल्या समस्या घेऊन हजर होते.

यात आदिवासी बहुल गावपाड्यावर वीजपुरवठा सुरळीत मिळत नाही, जो मिळतो तो ही कमी दाबाचा असतो. त्यामुळे शेती पिकांना पाणी मिळत नाही, पाण्याअभावी पिके जळत असून, आम्ही करावे काय? असा प्रश्न यावेळी वीज मंडळाचे अधिकारी यांना विचारण्यात आला.

या वेळी सुमारे चार तास या कार्यालयास टाळे ठोकून अधिकारी वर्गाला कोंडून ठेवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अजित साबळे आणि कर्मचारी घटनास्थळी पोचले.

Villagers protesting outside the office of the Electricity Board
Jalgaon News : चोपडा कारखान्याकडून उसाला सव्वीसशेचा भाव

त्यांनी आंदोलनकर्ते, अधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणली. त्यावेळी डॉ. बारेला यांनी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देत या दरम्यान आमची समस्या न सुटल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

तसेच आमच्या पिकांचे नुकसान झाल्यास आपण सर्व अधिकारी जबाबदार असाल, असे आवाहन करीत आजचे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे नेते डॉ. बारेला, युवक विधानसभा क्षेत्रप्रमुख अमोल राजपूत, युवक जिल्हा सरचिटणीस सचिन डाभे, दिनेश पावरा, राजू पावरा, रमेश सांगोरे, इता पावरा, सागर सांगोरे, बन्सीलाल सांगोरे.

केदार पावरा, भाईदास पावरा, अमरिश पावरा, गुजल्या पावरा, प्रकाश पावरा, रायसिंग पावरा, दारासिंग पावरा, तूरसिंग पावरा, वेलसिंग पावरा, डोंगरसिंग पावरा ,गुलाब आबा पाटील यांच्यासह अनेक आदिवासी बांधव आणि परिसरातील नागरिक हजर होते.

Villagers protesting outside the office of the Electricity Board
Aditya Thackeray Jalgaon Daura : शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.