Jalgaon News : भुयारी गटारी प्रकल्प जानेवारीत; प्रतीक्षा संपली

भुयारी गटारींच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या शिवाजीनगरातील प्रकल्पाची वीजजोडणी अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरअखेर ती पूर्ण होणार आहे.
Subway Sewerage Project in Shivajinagar.
Subway Sewerage Project in Shivajinagar.esakal
Updated on

Jalgaon News : भुयारी गटारींच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या शिवाजीनगरातील प्रकल्पाची वीजजोडणी अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरअखेर ती पूर्ण होणार आहे.

जानेवारीत प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. (Underground Sewerage Project in January jalgaon news )

त्यामुळे आता मेहरुण, जुनागाव, शिवाजीनगर हा गावठाण भाग भुयारी गटारीला जोडण्याची प्रक्रिया लवकर सुरू होत असून, त्यासाठी महापालिकेतर्फे लायसन्सधारी प्लंबर नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प विभागातर्फे देण्यात आली आहे.

जळगाव शहरात भुयारी गटारी योजनेचा टप्पा क्रमांक एक २०१९ मध्ये सुरू करण्यात आला. अगदी कोरोनाकाळात काही महिनेच या प्रकल्पाचे काम बंद होते. त्यानंतर ते सुरू करण्यात आले आहे. शहरात गावठाण भागात या प्रकल्पाचे काम प्रथम सुरू करण्यात आले होते.

जुनेगाव, शिवाजीनगर, बळिराम पेठ, नवी पेठ ते थेट मेहरुण भागापर्यंत या प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. यासाठी सर्व भागात सांडपाणी वाहण्याचे पाइप अंडरग्राउंड टाकण्यात आले आहेत, तर चेंबर्सही तयार करण्यात आले आहेत.

लेंडी नाल्याजवळ प्रकल्प

भुयारी गटारीतून प्रत्येक घरातील सांडपाणी, तसेच शौचालयातील मैला भुयारी गटारीमार्गे शिवाजीनगरातील लेंडी नाल्याजवळ जमा करण्यात येईल. या ठिकाणी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे. हे सांडपाणी दीपनगर प्रकल्पाला देण्यात येणार आहे.

Subway Sewerage Project in Shivajinagar.
Jalgaon News : ‘शिवाजी महाराजांची लष्कर नीती’वर चर्चासत्र; 16, 17 फेब्रुवारीस आयोजन

प्रकल्पावर वीजजोडणी

शिवाजीनगरातील हा प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून तयार आहे. मात्र त्याची वीजजोडणी अद्यापही झालेली नव्हती. मंत्रालयातून त्याला मंजुरी मिळत नव्हती; परंतु गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्याला मंजुरी मिळाली. त्याच्या निविदा काढून त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. आता ही जोडणी अंतिम टप्प्यात आहे. जानेवारीत त्याची ट्रायल घेऊन तो प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचेही प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जानेवारीत घरनिहाय जोडणी

भुयारी गटारी योजनेंतर्गत प्रत्येक घराबाहेर चेंबर्स तयार करण्यात आले आहेत. त्यातून शौचालयातील मैला, तसेच सांडपाणी वाहून जाणार आहे. त्याकरिता आता प्रत्येकाच्या घरातील शौचालयाच्या मैला टाकीला जोडलेला पाइप आता या चेंबर्सला जोडला जाईल, तसेच घरातील बाथरूमचा पाइपही त्याला जोडला जाईल.

यासाठी महापालिकेतर्फे लायसन्सधारक प्लंबर्स नियुक्त करण्यात येणार आहे. त्यांना जोडणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर या प्लंबर्सकडून नागरिकांनी जोडणी करून घ्यावयाची आहे. साहित्य नागरिकांनी आणून जोडणीची फीसुद्धा संबंधित प्लंबर्सला अदा करावयाची आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही जोडणी सुरू होणार आहे. त्यामुळे घरातील सांडपाणी आता गटारीतून न वाहता याच भुयारी गटारीत जाणार आहे. गटारीत केवळ पावसाचे पाणी वाहणार आहे.

''शिवाजीनगरातील भुयारी गटारीच्या सांडपाण्यावरील प्रकल्पाची वीडजोडणी जानेवारीत पूर्ण होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या घरातील शौचालयाच्या पाइपची जोडणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येईल. त्यासाठी शहरातील लायसन्सधारी प्लंबर्सना नियुक्त करण्यात येईल. साहित्य व जोडणी फी नागरिकांनी अदा करावयाची आहे.''- योगेश बोरोले, प्रकल्प अधिकारी महापालिका, जळगाव

Subway Sewerage Project in Shivajinagar.
Jalgaon News : महसूल वसुली 100 टक्के करा : जिल्हाधिकारी प्रसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.