Unfit Luxury Bus : नाशिकच्या लक्झरी अग्नितांडवानंतर जिल्ह्यात कारवाई तीव्र

Unfit Luxury Bus
Unfit Luxury Busesakal
Updated on

जळगाव : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील चिंतामणी ट्रॅव्हल्स‌च्या बस अपघातात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्या‍त राज्यांतर्गत आणि परराज्यातून येणाऱ्या प्रवासी वाहतूक बसच्या तपासणीसाठी खास फ्लाइंग स्कॉड गठीत करण्यात आले असून, सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने चोवीस तासांत तब्बल २६ लक्झरी बस जमा केल्या. अन‌फीट असलेल्या, परवाना नसणाऱ्या बसचालकांकडून अडीच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नाशिक बस जळीतकांडात १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, संबंधित विभागाला कारवाईच्या आणि प्रवासी वाहने तपासणीच्या कठोर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्यातर्फे स्थानिक पातळीवर सहा अधिकाऱ्यांचे फ्लाइंग स्कॉड स्थापन करण्यात आले असून, सर्व राज्य महामार्गांवर या पथकांतर्फे प्रवासी वाहतूक बस खासकरून स्लीपर कोच लक्झरी बसच्या सरप्राइज तपासण्या सुरू आहेत.

वाहनचालकाचा परवाना, वाहनाचे फिटनेस, अग्निअवरोधक यंत्रणेसह इतर सर्व तपासण्या करण्यात येत असून, अनफीट वाहनांवर दंडात्मक कारवाईचा सपाटाच उपप्रादेशिक परिवहन विभागाने लावला आहे. विशेष म्हणजे स्थानिक पातळीसह नाशिक विभागीय कार्यालय आणि मुंबईच्या स्कॉडतर्फेही अचानक तपासणीची पथके रवाना झाल्याचे सांगण्यात आले.(Unfit luxury Bus After Nashik bus accident case jalgaon district get strict action about bus management jalgaon news)

Unfit Luxury Bus
Jalgaon : अमळनेर दंगलप्रकरणी आणखी 15 जणांवर गुन्हे

चोविस तासांत २६ वाहने

नाशिकच्या घटनेनंतर जळगाव परिवहन विभागाच्या पथकाने मुंबई-नागपूर महामार्गावर, जळगाव-औरंगाबाद महामार्गासह बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर तपासणीसह कारवाई मोहीम तीव्र केली आहे. अवघ्या चोवीस तासांतच २६ प्रवासी वाहतूक लक्झरी बस जमा करून त्यांच्यावर कारवाई करत अडीच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

राजकीय हस्तक्षेपाचा अडसर

जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्या‍त प्रवासी वाहतूक वाहनांवर कारवाईचा प्रसंग आला तर राजकीय नेतेमंडळींकडून अडसर होत असल्याचा वाईट अनुभव येतो. आमच्या मतदारसंघातील वाहनेच तपासू नका, असे फर्मानही बजावले जात असल्याची माहिती असून, कारवाई झालेल्या लक्झरी बसचालकांमध्ये चर्चेतून कुणी अमुक आमदाराची भीती अधिकाऱ्यांना दाखवत होते, तर कुणी मंत्र्यांचा फोन लावून दिला. एका अधिकाऱ्याने चक्क संबंधित चालकाच्या मोबाईलवरून न बोलता स्वतःच्याच मोबाईलने फोनवरून बोलणे झाल्यावरही कारवाई केल्याने त्या वाहनचालकाचा इगो मात्र दुखावल्याचे जाणवले.

आकडे बोलतात...

जिल्ह्यात नोंदणीकृत बस...६३१

गुजरात-मध्य प्रदेशातून येणाऱ्या बस...१५

Unfit Luxury Bus
Jalgaon Muncipal Corporation : अमृत टप्पा 2.0 चा अहवाल सल्लागार नियुक्तीचा वाद

अनफीट वाहनांवर कारवाई अटळ

प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम सुरू असून, वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, परवाना, चालकाचा परवाना आणि टॅक्सेस पूर्ण भरलेले नसल्यास संबंधित वाहनांवर कारवाई होणारच. त्याचप्रमाणे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक आढळून आल्यास संबंधित लक्झरी बसना याचा भुर्दंड सोसावा लागेल. प्रवासी वाहतूक लक्झरी बस नियमानेच धावतील याची संबंधित मालक व चालक दोघांनी काळजी घ्यावी.

श्याम लोही,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

आरटीओंच्या आवश्यक सूचना

-आपत्कालीन दार (निर्गमनद्वार) सुस्थितीत असावे.

-क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक नको

-प्रत्येक बसमध्ये अग्निअवरोधक यंत्रणा कार्यान्वित असावी.

-लक्झरी बसमधून अवैध मालवाहतूक करता कामा नये.

-वाहनाचे फिटनेस व इतर आवश्यक दस्तऐवज जवळ बाळगावेत.

-फिक्स ग्लासविंडोजवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी हॅमर आवश्यक

-स्लीपर बर्थवर अतिरिक्त प्रवासी बसवून वाहतूक करू नये.

-चालक केबिनमध्ये इतर कुठलाही प्रवासी बसवू नये.

-वाहनाचे सर्व दिवे सुस्थितीत असावेत व रेडियम लावावे

Unfit Luxury Bus
Jalgaon Crime : जन्मठेपेतून जामिनावर सुटला अन् मित्राच्या जिवावर उठला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()