Latest Jalgaon News : आपल्या मोठ्या बहिणीसोबत आलेल्या चार भावंडांचा के. टी. वेअरच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १८) सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपरखेड (ता. चाळीसगाव) येथे घडली. रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
चाळीसगावपासून आठ किलोमीटरवरील पिंपरखेडे येथील उदय सुधाकर अहिरे यांच्या शेतात सेंधवा (मध्यप्रदेश) येथील सुभानिया देवचंद आर्य हे पत्नी व पाच मुलांसह शेतात कामासाठी आले आहेत.