Jalgaon News : वाजत गाजत कापसाची लागवड...! दुसखेडा येथील शेतकऱ्याचा अनोखा प्रकार

Laborers in Nitin Mahajan's field playing vajantri while planting cotton.
Laborers in Nitin Mahajan's field playing vajantri while planting cotton.esakal
Updated on

Jalgaon News : सध्या कापूस लागवडीचा मौसम असल्याने शेतकरी कमी वेळेत व कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या बियाण्यांच्या शोधात भटकत आहेत. (unique way of farmer for cultivation of cotton jalgaon news)

दुसरीकडे कापसाचे भाव प्रचंड खालावल्याने यावर्षी कापसाच्या लागवडीचे प्रमाण कमी होईल, असे भाकीत केले जात असताना दुसखेडा येथील शेतकऱ्याने मात्र शेतात वाजंत्री नेऊन वाजत गाजत केलेली कापसाची लागवड तालुक्यात चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरला आहे.

दुसखेडा येथील नितीन महाजन यांनी यावर्षी देखील कापूस लागवडीचा निर्णय घेऊन बियाणे खरेदी केले व गुरुवारी लागवडीचा मुहूर्त काढून लागवडीची संपूर्ण तयारी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Laborers in Nitin Mahajan's field playing vajantri while planting cotton.
Cotton Rate News : अनधिकृत विनापरवाना कापूस बियाण्याची विक्री; भरारी पथकाचा छापा; गुन्हा दाखल

एवढ्यावरच महाजन थांबले नाही तर त्यांनी अक्षरशः वाजंत्री पथक शेतात नेऊन वाजत गाजत बियाण्यांच्या थैल्यांचे पूजन केले.

शेतीच्या बांधावर विधिवत पूजा केली व कापूस लागवड करणाऱ्या मजुरांचा सन्मान करून त्यांना पेढे भरून वाजत गाजत कापसाची लागवड केली. नितीन महाजन यांच्या या अनोख्या कृतीतून काळ्या माती बाबतची आपुलकी स्पष्ट होत असून, वाजत गाजत कापूस लागवडीचा विषय तालुक्यात चांगलाच चर्चेला जात आहे.

Laborers in Nitin Mahajan's field playing vajantri while planting cotton.
Cotton Rate News : शेतकऱ्यांना मिळणार वाजवी दरात कापूस बीटी बियाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.