Jalgaon News : कानळदा रस्त्यावर सोमवारी (ता. २६) दुचाकी व रिक्षाच्या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह मागे बसलेली महिला व तिची मुलगी ठार झाली.
दुचाकीस्वार दिगंबर ऊर्फ महेश जोशी असल्याची काही तासांत ओळख पटली. (unknown mother daughter identified who died in accident jalgaon news)
तालुका पोलिसांनी दुचाकीवरील माय-लेकीची ओळख पटविली असून, आई गायत्री ऊर्फ सीमा प्रवीण कुलकर्णी (वय ३२) आणि मुलगी नंदिनी (वय ११, रा. बडवानी, मध्यप्रदेश) असे दोघांची नावे आहेत. पूर्वी या मायलेकी जळगावच्या शिवाजीनगरात राहत होत्या.
तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार अनिल फेगडे, नरेंद्र पाटील यांनी सुरवातीला ओळख पटेलेल्या दिगंबरच्या नातेवाइकांच्या माध्यामातून धरणगाव, पिंप्रीत शोध घेतला. मात्र, अपयश आले.
नंतर भुसावळ येथील दोन महिलांचा पोलिसांनी तपास केला. त्या महिलांच्या नातेवाइकांनाही बोलावले होते. मात्र, ओळख पटली नाही. नंतर चोपडा आणि थेट मध्यप्रदेश गाठून बडवानी येथे मृताची बहिणीचे घर असल्याची माहिती मिळाली. तेथे धडकल्यावर त्यांच्या नातेवाइकांना माहिती दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बहिणीने ओळखला मृतदेह
घटनेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री मृत महिलेच्या बहिणी आणि पतींना तालुका पोलिसांनी शोधून जळगावला आणले. रात्रीच त्यांना दोघांचे मृतदेह दाखवून ओळख पटवण्यात आली. मृत महिला गायत्री कुलकर्णी आणि तिची मुलगी नंदिनी असल्याचे निष्पन्न झाले.
शैक्षणिक कामासाठी जळगावला
नंदिनी कुलकर्णी ला. ना. शाळेची विद्यार्थिनी असून, शैक्षणिक कामासाठी त्या जळगावला आल्या होत्या. दिगंबरच्या दुचाकीने त्या शाळेत जाणार होत्या. मात्र, तत्पूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
पतीला कळाली होती घटना?
अपघातानंतर गायत्री यांचे पती रिक्षाचालक प्रवीण यांना घटना समजली. मात्र, त्याने तेव्हा रुग्णालयात कुठलीच ओळख दाखवली नाही, अशी माहिती अपघातात मदत करणारे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली.
हे कळताच मृत महिलेच्या नातेवाइकांनी पती प्रवीण याच्यावर संताप व्यक्त केला. मृत गायत्री यांचे माहेर चोपडा शहरातील असून, त्यांना मुलगा मंदार व मुलगी नंदिनी आहे. चोपडा येथे त्यांचे आई-वडील भाऊ, बहीण राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.