Jalgaon Unseasonal Rain : शिवाजीनगरात भिंत कोसळून सायकलस्वार गंभीर; वाहतूक खोळंबली

Ginning press wall in Shivajinagar
Ginning press wall in Shivajinagar esakal
Updated on

Nashik News : वादळी वारा, जोरदार पावसामुळे शिवाजीनगर भागात कानळद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर महावीर जिनिंग प्रेसची ३० फूट संरक्षक भिंत कोसळली. (Unseasonal rain 30 feet protective wall of Mahaveer Ginning Press collapsed on road in jalgaon News)

यामुळे सायकलस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. रस्त्यावर भिंत पडल्यामुळे संपूर्ण वाहतूक विस्कळित झाली होती.

शहरात शनिवारी (ता. २९) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

शिवाजीनगरात महावीर जिनिंग प्रेस व जे. के. जिनिंग प्रेसमधून कानळद्याकडे जाणाऱ्या मार्गावर संपूर्ण ३० फूट लांब भिंत कोसळली. त्यामुळे जोरदार आवाज झाला. रस्त्यावरून जाणारा सायकलस्वार त्या खाली दाबला गेला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. नागरिकांनी त्याला ताबडतोब रिक्षामधून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Ginning press wall in Shivajinagar
Jalgoan Agriculture News : बियाणे, खतांबाबत अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष; येथे करा तक्रार

दुसऱ्यांदा पडली भिंत

महावीर जिनिंग प्रेसच्या जुन्या भिंतीवरच नवीन भिंत बांधली आहे. विशेष म्हणजे या भिंतीच्या विटा या नवीन सिमेंटच्या आहेत. त्यामुळे मागे एकदाही भिंत कोसळली होती. सुदैवाने त्यात कोणीतीही हानी झाली नाही. आता पुन्हा ही भिंत पूर्णपणे कोसळली आहे.

अर्धी भिंत काढून घेण्याची गरज

पडलेल्या भिंतीपैकी अर्धी भिंत त्या ठिकाणी उभी आहे. ही भिंतही धोकादायक आहे. त्यामुळे ही भिंतही काढून घेण्याची गरज आहे, अन्यथा तीही पुन्हा कोसळण्याचा धोका आहे.

Ginning press wall in Shivajinagar
Mukhyamantri Solar Krushi Yojana : 334 एकर जागा जिल्हाधिकारी देणार : वीज कंपनीचे मुख्य अभियंता हुमणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.