जळगाव : भारतीय हवामान खाते, कृषी हवामान प्रभाग (पुणे) यांंनी राज्यात १८ मार्चपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसाची (unseasonal rain) शक्यता वर्तविली आहे. (unseasonal rain Agriculture Department issued guidelines for protection and care of crops from natural calamities jalgaon news)
१४ ते १६ मार्चदरम्यान जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कालावधीत होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण व काळजी घेण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
हरभरा, गहू, ज्वारी, भाजीपाला, टरबूज, पपई व केळी यासारख्या परिपक्व पिकांची काढणी लवकरात लवकर करावी. काढणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. नवीन लागवड केलेली फळझाडे आणि भाजीपाला पिकांचे वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी बांबूच्या काड्या व पॉलिप्रॉपिलीनचा आधार द्यावा.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
भाजीपाला व फळपिके झाकण्यासाठी हेलनेटचा वापर करावा. मेघगर्जना, विजांचा कडकडाट, गारपीट व वादळी वाऱ्यांपासून जनावरांना सुरक्षित ठिकाण बांधावे. मळणी करणे शक्य नसल्यास कापणी केलेले पीक पॉलिथिन पेपर किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावे.
आगंतुक स्वरूपात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बांधवांनी या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.