Unseasonal Rain Crop Damage : हातातोंडाशी आलेला घास हिरावला; गिरणा परिसरास ‘अवकाळी’चा फटका

Damage caused when water seeped into onion rows in Jibhau Patil's field.
Damage caused when water seeped into onion rows in Jibhau Patil's field. esakal
Updated on

Jalgaon News : गिरणा परिसरास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे भुईसपाट झालेल्या बाजरी, ज्वारी, मका, कांदा यांचे अतोनात नुकसान झाले असून, उत्पादनात देखील मोठी घट येण्याची शक्यता आहे. (Unseasonal rain caused huge damage to crops in chalisgaon jalgaon news)

हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. सर्वत्र नुकसान असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. मेहुणबारे परिसरात वातावरणात सकाळपासूनच प्रचंड उकाडा होता. काल रात्री साडेसातच्या सुमारास विजांचा कडकडाटासह अचानक पावसाने अक्षरशः गिरणा पट्यात झोडपून काढले. या पावसामुळे काढणीला आलेला कांदा, मका, बाजरी, पिकांना मोठा तडाखा बसला.

पावसाच्या माऱ्याने पिके जमीनदोस्त झाली. या पावसाने बाजरीचे व ज्वारीचे मोठे नुकसान झाले. शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याच्या वरीळीत देखील पावसाचे पाणी शिरल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

कांद्याचे प्रचंड नुकसान

गिरणा परिसरात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली होती. कांद्याला सध्या भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कांदा विक्री करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे सध्या कांदा वाफ्यातच सडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी कांदा साठवूण ठेवणेही शक्य नाही. या वर्षी पिके कढणीच्या वेळीच पावसाने थैमान घातल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Damage caused when water seeped into onion rows in Jibhau Patil's field.
Amrut Yojana : तब्बल 45 कॉलन्यांत या तारखेपासून ‘अमृत’चे पाणी; नवी जोडणीचे आवाहन

कांदा झाकण्यासाठी धावपळ

कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. खरीप, रब्बी दोन्ही हंगामाचे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कांदा पिकाला उत्पादन खर्च जास्त लागतो व विक्रीच्या वेळी भाव मिळत नाही. यावर्षी भरपूर पाणी असल्याने कांदा लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्गाने केली. पण अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले.

त्यामुळे ५०० रुपये प्रति क्विंटलने सध्या कांदा विकावा लागत आहे. काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडत आहे. ‘यंदा पिकांना चांगला बाजारभाव मिळेल, अशी आशा होती. परंतु या पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. शेतमालाला भाव नाही, त्यातच अवकाळीच्या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे अक्षरश:कंबरडे मोडले आहे.

संपूर्ण कर्जमाफीची मागणी

यावर्षी अवकाळी पावसाचा फटका कापसाबरोबर सर्वच पिंकाना बसला आहे. उत्पादन कमी व खर्च जास्त अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यामुळे शंभर टक्के उत्पन्न बुडाले आहे. कांदा, मका, बाजरी, ज्वारीचे पीक हातचे गेल्यामुळे बळीराजा हताश झाल्याचे चित्र दिसत आहे.

पावसाने शेतकरी हातबल झाला आहे. या भागातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून शासनाने त्यांना आधार द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काही शेतांमध्ये आठ दिवस देखील वाफसा होणार नाही. त्यातच शेतातच माल पडुन असल्याने शेतकऱ्याच्या डोळ्याला अश्रू येत आहेत व ज्या शेतकऱ्यांचे शासनाने नुकसान झाले आहे त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Damage caused when water seeped into onion rows in Jibhau Patil's field.
Bazar Samiti Result Analysis : आमदार चव्हाणांची व्यूहरचना ठरली भेदक; ‘मविआ’तील गटबाजीचे निकालावर पडसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.