Unseasonal Rain Damage : जामनेर तालुक्यात पुन्हा झोडपले; वादळी वाऱ्यासह पाऊस

unseasonal rain damaged crops file photo
unseasonal rain damaged crops file photoesakal
Updated on

Unseasonal Rain Damage : शहरासह तालुक्यात रविवारी (ता. ३०) सलग पाचव्या दिवशी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. सोबतच वादळी वाऱ्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. यामध्ये अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. शहरातील अनेक भागांमधील रहिवाशांच्या घरावरील पत्रे दूरवर उडाल्याने अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. (Unseasonal Rain Damage Storms again in Jamner Taluka Rain with strong winds jalgaon news)

या अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या फटक्यात वाहनेही उलटी झाली. शहरातील विविध भागांमधील नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार अरुण शेवाळे, भाजप नेते जितू पाटील, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर आदीसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत.

वादळी वाऱ्यामुळे झाडावरील अनेक पक्षी खाली येऊन पडले. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून शहरासह तालुक्यातील अनेक भागांमधील वीज खंडित करण्यात आली आहे. सोबतच शेतातील शेतीमाल आणि पशुधनाच्या चाऱ्याचे (कडबा-कुट्टी ) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पहूर परिसरात नुकसान

पहूर (ता. जामनेर) : रविवारी सलग पाचव्या दिवशी पहूर परिसरात गारपिटीसह वादळाचा तडाखा बसला. सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तसेच जळगाव छत्रपती - संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अजिंठा पेट्रोल पंपाचे शेड कोसळले. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. शेडखाली दोन दुचाकी दबल्या.

शिवनगर भागात अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. बसस्थानकावरील शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या शिवकृपा टी सेंटरचे तसेच सुनील पाटील यांच्या सह्याद्री हॉटेलचे पत्रे उडाली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

unseasonal rain damaged crops file photo
Nashik Unseasonal Rain Damage : काटवन परिसरात कांदापीक पाण्यात; अवकाळीचा पुन्हा तडाखा

वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज खांब वाकले असून, वीजतारा लोंबकळलेल्या स्थितीत असल्याने पुरवठा खंडित झाला. मुस्लिम कब्रस्तान येथे सुरू असलेल्या कॉम्प्लेक्सच्या भिंती खचून गेल्या. आज झालेल्या गारपिटीने शेतीसह वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

चांगदेव परिसरात मुसळधार

चांगदेव (ता. मुक्ताईनगर) : परिसरात रविवारी (ता. २९) रात्री आठच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे चांगदेव परिसराला अवघ्या दहा मिनिटात जमीनदोस्त करून टाकले.

मोठमोठी झाडी पडली, विजेचे खांब कोसळले, घरांवरील पत्रे उडाले, ट्रॅक्टर ट्रॉली तुफान वाऱ्याने पलटल्याने अक्षरशः वाकली, एवढ्या जोरात वादळी वारे चांगदेव परिसरात वाहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, केळी पीक जमीनदोस्त झाली आहे. सततच्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

unseasonal rain damaged crops file photo
Dhule Agriculture News : रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषी यंत्रणेची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.