Success Story : जमीनदोस्त केळीला विक्रमी भाव! तांदलवाडी येथील महाजन कुटुंबाची किमया

10 Mays Banana plants overturned by a storm and In the second photo, bunches of quality bananas from same banana plantation
10 Mays Banana plants overturned by a storm and In the second photo, bunches of quality bananas from same banana plantationesakal
Updated on

रावेर (जि. जळगाव ) : वादळ, अतिवृष्टी, गारपीट या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या पाचवीलाच पुजलेल्या नैसर्गिक आपत्ती आहेत. वादळात उन्मळून पडलेली केळीची झाडे नाईलाज म्हणून शेतकरी उपटून फेकून देतात आणि एकतर पुन्हा केळीची लागवड केली जाते किंवा अन्य पिकांचे नियोजन केले जाते. (Uprooted banana trunks brought back to life by soiling stubbornly cultivated banana by farmer jalgaon news)

यात शेतकऱ्यांचा भरपूर वेळ आणि खर्चही वाया जातो. पण तालुक्यातील तांदलवाडी येथील ज्येष्ठ केळी उत्पादक शेतकरी वसंत महाजन आणि त्यांची मुले- श्रीकांत महाजन व प्रशांत महाजन यांनी मे महिन्यात वादळामुळे उन्मळून पडलेली केळीची खोडे पुन्हा माती लावून जगवली; जिद्दीने या केळीची जोपासना केली.

नुकतीच या सर्व १३ हजार केळी खोडांची कापणी सुरू झाली असून महाजन बंधूंनी २८५० रुपये अशा विक्रमी भावाने या केळीची विक्री केली आहे. तालुक्यातील तांदलवाडी येथील ज्येष्ठ केळी उत्पादक शेतकरी वसंत महाजन आणि त्यांची दोन्ही मुले श्रीकांत महाजन आणि प्रशांत महाजन यांनी २० मार्च २०२२ ला आपल्या शेतात १३ हजार टिश्यू कल्चर केळी रोपांची लागवड केली.

एप्रिल महिन्यात या रोपांची देखभाल करीत पाणी, खते यांचे नियोजन केले. मात्र दुर्दैवाने १० जून २०२२ ला या पट्ट्यात आलेल्या वादळाने ही सर्व ५० दिवसांची १३ हजार केळीची खोडे जमीन दोस्त झाली. या वादळी फटक्याने परिसरातील सर्वच केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख होते. महाजन कुटुंबीय ही त्याला अपवाद नव्हते.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

10 Mays Banana plants overturned by a storm and In the second photo, bunches of quality bananas from same banana plantation
Jalgaon News : सूर्यनमस्काराने मानसिक, शारीरिक विकार दूर; सामूहिक सूर्यनमस्कार दिन

मात्र हे मन विषण्ण करणारे चित्र बदलण्याचा निर्धार महाजन कुटुंबाने केला. वसंत महाजन त्यांच्या दोन्ही मुलांसह कामाला लागले. ही आडवी पडलेली केळी उपटून फेकून देण्यापेक्षा याच रोपांना पुन्हा माती लावून उभे करण्याचा, जगविण्याचा निर्णय तिघांनी घेतला. ७०-८० मजुरांना पाचारण करून तातडीने एक - एक खोड पुन्हा उभे करून त्याला माती लावण्यात आली आणि पाणीही दिले गेले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ मे रोजी पुन्हा एकदा वादळाचा हलका तडाखा बसला आणि माती लावलेली केळीची खोडे पुन्हा थोडी झुकली पण तिघांनी ३ दिवस स्वतः शेतात उभे राहून काळजीपूर्वक एक एक खोड उभे केले. सुदैवाने ही सर्वच १३ हजार खोडं पुन्हा जगली, उभी राहिली आणि जोमाने वाढू लागली. यातील एकही खोड वाया गेले नाही हे विशेष!

केळीला विक्रमी भाव

मागील आठवड्यातच या केळीची कापणी सुरू झाली सुरुवातीला सुमारे १०० क्विंटल केळीची कापणी झाली. त्यावेळी केळीला १९५० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी पुन्हा या केळीची विक्री झाली असून बऱ्हाणपूर बाजारपेठेत या केळीला विक्रमी म्हणजे २८५० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. सध्या केळीला बाजारपेठेत सुमारे १६०० ते १७०० रुपये क्विंटलचा भाव मिळत असताना त्यापेक्षा ११०० रुपये जादा भाव त्यांना मिळाला आहे.

"मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर केळी उन्मळून पडल्यावर आम्हीही काहीसे हताश झालो होतो; परंतु जैन इरिगेशनचे केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार केळी पुन्हा उभी करण्याचा निर्णय घेतला. केळीच्या मुळांची आणखी जोमाने वाढ होण्यासाठी जिवाणू युक्त खते दिली. त्याचा चांगला परिणाम आज दिसून येत आहे." - प्रशांत महाजन, केळी उत्पादक शेतकरी, तांदलवाडी

10 Mays Banana plants overturned by a storm and In the second photo, bunches of quality bananas from same banana plantation
Jalgaon News : जुनी पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचारी संपावर जाणार..?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.