जळगाव : देशात चौथ्या लाटेचे संकट ‘आ’ वासून उभे आहे. चीनसह इतर परकीय देशात कोरोना संसर्ग पुन्हा डोके वर काढू लागले आहे. देशभरात किमान ४० दिवस सतर्कतेचे आदेश आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहेत.
कोरोनाचे संकट पाहता लस न घेतलेल्यांची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर धाव सुरू झाली आहे. मात्र, कोव्हिशील्ड, कार्बोवेक्सचा लशीच उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेकवेळा जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही लस उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. (Vaccine shortage of Covishield Corbevax in Jalgaon Jalgaon News)
कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव पाहता जिल्हास्तरावर, ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्ण आल्यानंतर करावयाची मॉकड्रिलही नुकतीच झाले. संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गप्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर पुन्हा गर्दी होत आहे. जिल्ह्यात कोव्हिशील्डसह कार्बोवेक्स लशीचा साठा नसल्याने लसवंतांना माघारी जावे लागत आहे.
८० टक्के लसीकरण
जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावानंतर १६ जानेवारी २०२१ पासून संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. १५ जुलै ते ३० सप्टेंबरदरम्यान सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ दिवस मोफत बूस्टर (प्रिकॉशन) लसीकरण मोहीम राबविली होती. त्यानुसार आतापर्यंत लसीकरण पात्र ३७ लाख ७८ हजार ३३१ नागरिकांपैकी ३० लाख ५७ हजार ९८३ (८०.९३ टक्के) नागरिकांना पहिल्या, तर २५ लाख २० हजार ४४२ (६६.७१ टक्के) नागरिकांनी लशीची दुसरा डोस घेतला आहे.
१२ ते १४ वयोगटांतील एक लाख ४६ हजार ३४ पैकी एक लाख १७ हजार २२८ (८०.२७ टक्के) किशोरवयीनांचे लसीकरण झाले आहे. जामनेर, यावल, रावेर, भुसावळ, चाळीसगाव या तालुक्यांत लसीकरण ७६ ते ३४ टक्क्यांच्या आत आहे.
अमळनेर, एरंडोल, चोपडा, पाचोरा, धरणगाव, पारोळा तालुक्यांत मात्र ८३ ते ७७ टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. १५ ते १७ वयोगटांत दोन लाख २१ हजार ७७३ युवकांपैकी एक लाख ४८ हजार ४२१ (६५.७४ टक्के) युवकांचे लसीकरण झाले आहे. रावेर, यावल वगळता अन्य तालुक्यांत सरासरी ९६ टक्के लसीकरण झाले आहे.
१८ वयोगटांतील ३४ लाख सहा हजार ५२४ नागरिकांपैकी २३ लाख ३२ हजार ५०६ (६८.४७ टक्के) नागरिकांनी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण केले आहे.
बूस्टर लसीकरणाची जनजागृती गरजेची
जिल्ह्यात जुलैपूर्वी कोरोना बूस्टर डोस ६०० रुपयांत दिला जात होता. मात्र, सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासन स्तरावरून १५ जुलैपासून मोफत बूस्टर लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
त्यानुसार आतापर्यंत १५ लाख ६३ हजार ८५० लसीकरण पात्र नागरिकांपैकी केवळ तीन लाख ७२ हजार ४८६ (२३.८२ टक्के) नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. यापूर्वी प्रशासनाने लाभार्थ्यांसाठी लशीच्या साठ्याची तरतूद केली होती. मात्र, सामान्यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने लससाठा अक्षरशः वाया गेला.
जळगाव शहरात आतापर्यंत दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोससाठी पात्र असणाऱ्या ५२ हजार ९३५ लाभार्थ्यांना बूस्टर डोसचा लाभ देण्यात आला आहे. १ जानेवारीपासून ते आतापर्यंत जळगाव शहरात ५८ जणांनी पहिला, एक हजार ५०७ जणांनी दुसरा, तर ४८२ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे.
लशीची मागणी
सद्यःस्थितीत जिल्हास्तरावर पालिकेकडे कोव्हॅक्सिन २१०० व्हायल लससाठा शिल्लक आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिका रुग्णालय प्रशासनाकडून कोव्हिशील्ड २० हजार, कोव्हॅक्सिन पाच हजार आणि कार्बोवेक्स २० हजार याप्रमाणात लशींची मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.