Jalgaon News : वालझिरी, पाचपांडव मंदिरांचा होणार कायापालट; उन्मेष पाटील यांचे प्रयत्न

panoramic view of the temple.
panoramic view of the temple.esakal
Updated on

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात यापूर्वी श्रीक्षेत्र वटेश्वर आश्रम वडगाव लांबे, श्रीक्षेत्र बगळीदेवी मंदिर सायगाव, श्रीक्षेत्र सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी, श्रीक्षेत्र ऋषिपांथा बहाळ तसेच कला महर्षी केकी मूस कलादालन या क्षेत्रांचा तत्कालीन आमदार असताना मोठ्या प्रमाणावर विकास केल्यानंतर रामायणकर वाल्मीक ऋषींच्या पावन वास्तव्याने पुनित श्रीक्षेत्र वालझिरीसह,

महाभारत काळात वनवासात असलेले पाचपांडवांच्या वास्तव्य लाभलेले पाचपांडव मंदिरासाठी भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. (Valziri Pancha Pandava temples will be transformed Fund of 5 crore approved from regional tourism jalgaon news)

यापुढे तीर्थक्षेत्राला पर्यटनाची जोड दिल्यास या तीर्थक्षेत्रांच्या विकासाला अधिक मदत होणार आहे. यासाठी देव देश आणि धर्मासाठी पर्यटन निधीतून अशा तीर्थक्षेत्रांचा विकास होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेश पाटील यांनी केले.

खासदार पाटील यांच्या दूरदृष्टी व नियोजनातून राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधी अंतर्गत मतदारसंघातील विविध तीर्थक्षेत्रांना पाच कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मंजूर झाल्याने खासदार उन्मेश पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

panoramic view of the temple.
Jalgaon Politics : नेते मोठे झाले, जळगाव नेतृत्वहीन... चूक नागरिकांची की?

असे तीर्थक्षेत्र, असा निधी

खासदार पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध तीर्थक्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे. यात प्रामुख्याने श्रीक्षेत्र वालझिरी (ता. चाळीसगाव) येथे तीर्थक्षेत्राचा पर्यटन निधीतून विकासासाठी १ कोटी, चाळीसगाव येथील रेणुका माता मंदिर परिसरात विकासकामे १५ लाख, करगाव रोड चाळीसगाव येथील गणेश मंदिरासाठी १० लाख, त्याचप्रमाणे खंडेराव महाराज मंदिर कराडी (ता. पारोळा) मंदिराचा पर्यटन निधीतून विकास (१ कोटी), तसेच धनाई पुनाई माता मंदिर दरेगाव (ता. चाळीसगाव) मंदिराचा पर्यटन निधीतून विकास ३० लाख,

बोळे (ता. पारोळा) येथील खंडेराव मंदिरासाठी १ कोटी, श्रीक्षेत्र पाचपांडव मंदिर (टिटवी, ता. पारोळा) येथे पर्यटन विकास अंतर्गत विकास कामांसाठी ५० लाख, श्रीक्षेत्र चतुर्भुज नारायण मंदिर गिरड (ता. भडगाव) या तीर्थक्षेत्राचा पर्यटन निधीतून विकास करण्यासाठी ५० लाख या अनुषंगाने सुमारे पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.

panoramic view of the temple.
Jalgaon News : केळी ओव्हरलोडबाबत धोरण ठरवा; तूर्तास दंड न आकारण्याचे आमदार चौधरींचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.