मेहुणबारे(जि. जळगाव) : चाळीसगाव व भडगाव तालुक्याला वरदान ठरलेल्या वरखेडे- लोंढे बॅरेज(मध्यम) प्रकल्पाचे मुख्य धरणाचे काम पूर्ण झालेले असून मात्र वितरण प्रणालीच्या कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. हा प्रकल्प गिरणा नदीवर, मौजे वरखेडे बुद्रूक गावापासून १ किलोमीटर व चाळीसगाव शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. (Varkhede Londhe Medium Project work of dam completed but work of distribution system not started jalgaon news)
चाळीसगाव व भडगाव तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या वरखेडे- लोंढे (मध्यम )प्रकल्पा च्या ‘पुनर्वसनाचा’ राज्य सरकार दरबारी असलेला प्रश्न सुटल्यावर, चाळीसगाव तालुक्यातील २० व भडगाव तालुक्यातील ११ अशा एकूण ३१ गावातील ७ हजार ५४२ हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.
राज्य सरकारने १ मार्च १९९९ ह्या वर्षी मंजुरी मिळाली आणि २०१३ पासून ह्या प्रकल्पाचे काम सुरु झाले. त्यानंतर ह्या प्रकल्पाला दरसूचिनुसार वेळोवेळी निधी मिळत गेला. सुरवातीला सन १९९७/९८ ला ७५.६४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर २००७/०८ मध्ये त्या प्रकल्पाला १८ फेब्रुवारीला प्रशासकीय मान्यतेमध्ये वाढ होऊन २६४ रु कोटी मिळाले.
त्यानंतर २०१३/१४ मध्ये ९ मार्च २०१८ मध्ये ५२६ कोटी ६४ लाख रु प्राप्त झाले. २० सप्टेंबर २०१९ रोजी ह्या प्रकल्पाला ९५ हेक्टर वन जमिनीस, पर्यावरण व वन मंत्रालयाची मान्यता मिळाली. केंद्रीय जल आयोगाने १२ मार्च २०१८ च्या बैठकीत ५२६ कोटी ६४ लाख रुपये प्राप्त मिळाले. त्यानंतर नाबार्ड अंतर्गत अर्थसाहाय्य मिळाले.
हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
ह्या प्रकल्पाला चाळीसगाव तालुक्याचे तत्कालीन आमदार राजीव देशमुख, उन्मेष पाटील, मंगेश चव्हाण ह्या तिन्ही जणांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतल्याचे दिसत आहे. ह्या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने २०१७ मध्ये कामाला वेग आला. त्यावेळचे तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या बळिराजा संजीवनी योजनेंतर्गत समावेश करण्यात आला.
त्या प्रकल्पाचा कामाचा वेग वाढला. ह्या प्रकल्पाचे २२ वर्षांमध्ये सुद्धा काम पूर्ण न झाल्याने खर्चामध्ये सुद्धा वेळोवेळी वाढ झाली असल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी ह्या प्रकल्पाचे काम रात्रंदिवस काम करून, आता ह्या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आलेले आहे. ह्या प्रकल्पाचा एकूण प्रस्तावित पाणीसाठा ३५.६८ दलघमी (१.२६ टीएमसी) व प्रस्तावित जिवंत साठा ३४.७७ दलघमी(१.२३ टीएमसी) इतका आहे.
प्रकल्पाचे मुख्य धरणाचे काम जरी पूर्ण झाले तरी वितरण प्रणालीच्या कामाला आजपावेतो सुरवात झाली नाही. राज्य सरकारचे बंदिस्त नलिका वितरण प्रणालीबाबत धोरण असल्याने, त्या प्रस्तावास, महामंडळाच्या २३ जून २०२२ च्या पत्रानुसार,मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
ह्या प्रकल्पामुळे, शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होण्यासाठी लवकरात लवकर शेती पर्यंत पाणी पोहचण्यासाठी, बंदिस्त पाइप लाईन योजनेला मूर्त स्वरूप देणे गरजेचे आहे.
तसेच ह्या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील, परिसरातील पाणी पातळीत वाढ होणार असून, शहरालाही त्याचा फायदा होणार आहे. ह्या प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कृती समितीने, व तामसवाडी गावातील ग्रामस्थांनी १०० टक्के गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे,
त्यानुसार दि.२ मार्च २०२२रोजीच्या राज्यसरकारच्या राजपत्रात, तामसवाडी गावाच्या पुनर्वसनाची सुधारित अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. सदर पुनर्वसन प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे, धरणामध्ये पाणीसाठा करता आलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.