Jalgaon News: पिंप्राळा उड्डाणपूल सुरू झाल्याने वाहनांची कोंडी मिटली; काम अपूर्ण असल्याने नाराजी

Pimprala Railway Flyover opened for traffic after inauguration on Sunday.
Pimprala Railway Flyover opened for traffic after inauguration on Sunday. esakal
Updated on

Jalgaon News : येथील भोइटेनगर पिंप्राळा उड्डाण पुलाचे काल लोकार्पण झाल्याने आजपासून नागरिकांनी पुलावरून वाहतूक सुरू केली आहे. (vehicular traffic jam was resolved With opening of Pimprala flyover jalgaon news)

गणेश कॉलनी, शिवकॉलनीतून शिवाजीनगरसह त्या परिसरातील उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना पुलामुळे कमी वेळेत परिसरात येणे शक्य झाले आहे. विशेषत सुरत रेल्वेगेटवर होणारी गर्दी टळली आहे.

शिवाजीनगरसह इतर परिसरात जाण्यासाठी गणेश कॉलनीतील बजरंग बोगद्यातून निघून, पुढे सुरत रेल्वे फाटकातून जावे लागत होते. आता मात्र पुल सुरू झाल्याने थेट रिंगरोडवरून निघून शिवाजी नगरातील उपनगरात जाता येते. सुरत रेल्वे गेट बंद असल्यास ते उघडण्याची वाट पहावी लागत नाही.

Pimprala Railway Flyover opened for traffic after inauguration on Sunday.
Jalgaon Prakash Ambedkar: लोकसभेच्या 30 जागा भाजपला मिळू देऊ नका

दुसरीकडेमात्र पिंप्राळा वासियांसाठी उड्डाण पुलावरून निघालेल्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तो रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला नाही. यामुळे पिंप्राळ्याकडे जाताना बजरंग बोगद्याखालूनच जावे लागत आहे.

येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. उंच व मोठ्या वाहनांना बोगद्याखालून जाता येत नाही. ‘महारेल’ने पिंप्राळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांची आहे.

Pimprala Railway Flyover opened for traffic after inauguration on Sunday.
Jalgaon News: जिल्ह्यात 27 नवीन रुग्णवाहिका दाखल होणार; पालकमंत्र्यांची मंजुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.