Jalgaon Crime News : ग्रामस्थाच्या कुटुंबावर विळ्याने हल्ला

Beating
Beatingesakal
Updated on

Jalgaon Crime News : रामदेव वाडी (ता.जळगाव)येथे एका घरात सामानाची तोडफोड करत लाठ्या काठ्या तसेच विळ्याने कुटुंबातील पाच जणांना बेदम मारहाण केल्याची घटना सोमवार (ता.१ मे) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Village house was attacked and beaten by people jalgaon crime news)

जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथे विशाल अजमल जाधव कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सोमवार (ता.१ मे) रोजी रात्री ते, कुटूंबीयांसह घरी असताना त्यांच्याकडे गावातील आठ-दहा गावातील लोक आले. कुठलेही कारण नसताना या ग्रामस्थांनी अजमल जाधव यांच्या दुचाकीची तसेच घरात तोडफोड करण्यास सुरुवात केली.

जाधव कुटूंबावर हल्ला करणाऱ्यांपैकी नरेश जाधव यांनी विळ्याने करुणाबाई अजमल जाधव यांच्या उजव्या हातावर वार करुन जखमी केले. तर विलास रामदेव जाधव, युवराज रमेश जाधव यांनी विशाल जाधव यांच्या उजव्या पायावर तसेच डोक्यावर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात घरातील मेवाबाई पुना जाधव, पुना मंगू जाधव या दोघांनाही मारहाण केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Beating
Jalgaon Crime News : पान खाणे पडले महागात! पाठ वळताच दुचाकी लंपास

यावेळी विशाल अजमल जाधव यांच्याबरोबर रवींद्र राजमल जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हल्लेखोरांनी घरातील संसारपयोगी साहित्याची तोडफोड करत मारहाण केली.

याप्रकरणी जखमी विशाल अजमल जाधव यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रामदास काळू जाधव, विलास रामदास जाधव, खुशाल रामदास जाधव, नरेश रामदास जाधव, युवराज रमेश जाधव, धनराज रमेश जाधव, रमेश काळू जाधव, कमलाबाई रामदास जाधव, (सर्व रा. रामदेववाडी) या आठ जणांविरुद्ध दंगलीचा तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहेत.

Beating
Crime News : दारु प्यायला पैसे दिले नाही म्हणुन मजुराला मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.