Jalgaon Sand News : जिल्ह्यात वाढलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात आता गावांमधील नागरिक एकत्रित येऊन लढा देत आहेत. गिरणा पात्रालगत असलेल्या दापोरा (ता. जळगाव) गावात वाळू तस्करीविरुद्ध एल्गार पुकारत ग्रामस्थांनी नदीकडे जाणारा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदून काढला.
ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने हे काम करण्यात आले असून यापुढे पात्रातून वाळू उपसा होऊ देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.(Villagers against illegal sand transport at girna river jalgaon news)
अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न जिल्ह्यात बिकट बनला आहे. महसूल व पोलिस विभागाने संयुक्तपणे कारवाई सुरू केल्यानंतर वाळू उपसा नियंत्रणात आला नाही. त्यात जळगाव शहर व तालुका परिसरात या समस्येने कळस गाठला आहे.
एकीकडे नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा करून पर्यावरणाचा नाश करणे, तर दुसरीकडे वाळू वाहतूक करणाऱ्या सुसाट डंपर, ट्रॅक्टरमुळे अपघात होऊन नागरिकांचा मृत्यू होत आहे. मात्र, तरीही या समस्येवर अद्याप नियंत्रण मिळाले नाही.
ग्रामस्थांचा पुढाकार
गावांमधून वाळू उपशास विरोध होत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी आव्हाणे (ता. जळगाव) गावातून वाळू उपशास तीव्र विरोध झाला. त्यातून वाळूमाफिया व ग्रामस्थांमध्ये वाद होऊन वातावरण तणावपूर्ण बनले. आता गावालगतच्या पात्रातून वाळू उपसा होऊ देणार नाही, असा संकल्प ग्रामस्थांनी केला.
जिल्हा प्रशासनाकडून कौतुक
दापोरा गावाजवळ गिरणा नदीचे पात्र आहे. पात्रातून दररोज मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत होता. दररोज गाव व परिसरातील ट्रॅक्टर, डंपर वाळू वाहतूक करत होते. त्यासाठी गावालगतच्या शेतातून नदीपात्रापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. गुरुवारी (ता. ७) सकाळी ग्रामस्थांनी एकत्रित येत हा रस्ता खोदण्याचे ठरवले.
त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. यावेळी सरपंच माधवराव गवंदे, तलाठी मयूर महाले, ग्रामसेवक दिलीप पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी वाळू उचलू द्यायची नाही, असा संकल्प केला. ग्रामस्थांच्या पुढाकाराचे जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.