New Voter Registration: दुर्लक्षित घटकांसाठी जळगावात मतदारनोंदणी शिबिर

voter registration
voter registrationEsakal
Updated on

New Voter Registration : केंद्रीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

२७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. (Voter registration camp for marginalized sections jalgaon news)

जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून तृतीयपंथीय, देह व्यवसाय करणाऱ्या, बेघर, भटक्या आणि विमुक्त जाती जमातींच्या दुर्लक्षित घटकातील व्यक्तींसाठी २ व ३ डिसेंबरला विशेष शिबिर प्रत्येक मतदानकेंद्रावर होत आहे.

या कालावधीत संबंधित यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांना मदत करण्यासाठी पूर्णवेळ उपस्थित राहतील. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन निवडणूक विभागास सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

voter registration
Voter Registration App : नवीन मतदारांनो, ‘घरबसल्या’ नावनोंदणी करा; व्होटर हेल्पलाईनचा घ्या लाभ...

ज्या व्यक्तीचे १ जानेवारी २०२४ ला वयाची १८ वर्ष पूर्ण होत आहेत, परंतु मतदारयादीत नाव नाही, अशा व्यक्तीने आपले नाव मतदारयादीत समाविष्ट करून घेण्यासाठी फॉर्म नमुना ६ भरून द्यावा.

अर्हता दिनांकाला १८ वर्षे वय पूर्ण करणाऱ्या मतदाराचे नाव त्या अर्हता दिनांकाला मतदारयादीमध्ये समाविष्ट केले जाईल. https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर अथवा Voter Help line App द्वारे सुध्दा मतदार आपली नावनोंदणी करू शकतात.

voter registration
New Voter Registration: नवमतदारांची 80 टक्के ऑनलाइन नोंदणी; वर्षभरात 59 हजार मतदार वाढले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.