Jalgaon Waghur Dam : वाघूर धरण 94 टक्के भरले; अन्य धरणांतही वाढला पाणीसाठा

Dam
Damesakal
Updated on

Jalgaon Waghur Dam : आतापर्यंत झालेल्या पावसाने धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. एकूण तेरा मध्यम, तीन मोठ्या प्रकल्पात मिळून एकूण ८९.८९ टक्के जलसाठा जिल्ह्यात आहे. यामुळे खरिप हंगामातील कापूस व रब्बी हंगाम चांगला येणार आहेत. सिंचनासाठी मोठी सोय यामुळे झाली आहे. (Waghur Dam is 94 percent full jalgaon news)

वाघूर धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने जळगाव शहर, जामनेर व तालुक्यातील पाणी टंचाई मिटल्यात जमा आहे. हतनूर धरणात ७५ टक्के साठा आहे. हतनूर परिसरातील तापी काठची गावे, रावेर, यावल, भुसावळ परिसरातील पाणी टंचाई मिटली आहे. गिरणा धरणात ५६ टक्के पाणी आहे. अजून पावसाची शक्यता आहे.

यामुळे गिरणा पट्ट्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यांना त्याचा लाभ होणार आहे. खरिप हंगामातील जिरायती कापसाचे नुकसान झाले असले, तरी आहे त्या पिकांचे चांगले उत्पादन येणार आहे. सोबत रब्बी हंगाम चांगला येण्याची आशा निर्माण झाली आहे.

Dam
Jalna Rain News : जिल्ह्यात ९.९० मिलिमीटर पाऊस

धरणातील पाणीसाठा (टक्के) असा

धरणाचे नाव साठा गतवर्षीचा साठा

हतनूर ७४.९० ८०.२०

गिरणा ५५.३८ १००

वाघूर ९३.५७ ८९.६६

जिल्ह्यातील अंभोरा, मंगरूळ, सुकी, तोंडापूर ही धरणे १०० टक्के भरली आहेत. तर मोर ९५.५८, अग्नावती ९.२८, हिवरा २३.७९, बहुळा ५०.८५, अंजनी ८२.७४, गुळ ८०.६६, भोकरबारी २१.७६, बोरी २८.३२, मन्याड ४०.२७ टक्के असा पाणीसाठा आहे.

Dam
Jalgaon Rain News : अंजनी प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()