Jagaon Cotton Crop Insurance: जिल्ह्यात कापूस पीकविम्याच्या रकमेची प्रतीक्षा! शेतकरी संघटनेचा 30 जानेवारीचा ‘अल्टिमेटम’

शेतकऱ्यांना हजार रुपयांची मदत मिळविण्यासाठी विमा कंपन्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहे.
Cotton Crop
Cotton Cropesakal
Updated on

चोपडा : खरीप हंगामाच्या सुरवातीला जून- जुलै महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने व सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे कापसासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

शेतीमालाचे लाखो रुपयांचे नुकसान भरून निघावे, यासाठी शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना लागू केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना हजार रुपयांची मदत मिळविण्यासाठी विमा कंपन्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस पीकविम्याची रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली आहे. (Waiting for cotton crop insurance amount in district ultimatum of farmers organization on 30 January jalgaon)

या वर्षी जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ५५ हजार ७७९ शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात ८७ महसूल मंडळांपैकी २७ महसूल मंडळात २१ दिवसांचा पावसाचा खंड पडल्यामुळे ‘त्या’ २७ मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम म्हणून पीकविम्याची रक्कम आता वाटप करण्यात आली.

मात्र उर्वरित ६० महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे व अवकाळी पावसामुळे कापसासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडे वेळीच पीक नुकसानीच्या तक्रारी नोंदवून व पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून जवळपास ४ महिने झाले तरी ही त्या शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम अजूनपर्यंत मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

पीकविमा भरताना एक विशिष्ट मुदतीत भरावा लागतो, तसेच पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत तक्रार दाखल करावी लागते.

Cotton Crop
Makar Sankranti 2024 : बोळके बनविण्यासाठी कारागिरांची लगबग; मकर संक्रांतीनिमित्त वाढती मागणी

मात्र नुकसानग्रस्त शेतावर पीक पंचनामे करायला कोणतीही मुदत दिली जात नाही, तसेच पीकविम्याची रक्कम देताना कोणतीही ठोस मुदत दिली जात नाही. ‘हम करे सो कायदा’..! या प्रमाणे पीकविमा कंपन्या वागतात.

कार्यालयावर मोर्चा काढणार

येणाऱ्या ३० जानेवारीच्या आत जिल्ह्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीच्या रकमा जमा कराव्यात, अन्यथा शेतकरी संघटना पीकविम्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, किरण गुजर, विनोद धनगर, सचिन शिंपी, अखिलेश पाटील, सय्यद देशमुख आदी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Cotton Crop
Nashik News: छडीचा छम..छम.. नव्हे.. बाटल्यांची टणटण...! ‘हुंडीवाला लेन’च्या बंद शाळेतील प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.