Jalgaon Crime : अवैध धंद्यांमुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात; लवकरच ‘वॉशआउट’ मोहीम

Washout campaign soon due to law and order threat due to illegal businesses jalgaon crime news
Washout campaign soon due to law and order threat due to illegal businesses jalgaon crime newsesakal
Updated on

Jalgaon Crime : शहर व तालुक्यात अवैधधंद्यांना ऊत आला असून, संरक्षण देण्याचे काम यंत्रणेकडून केले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या कार्यकाळात ‘एमपीडीए’च्या कारवायांमध्ये वाढ झाली असून, गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

मात्र मागील काळातील दंगलींच्या घटनांमध्ये शहर होरपळून निघाले आहे. (Washout campaign soon due to law and order threat due to illegal businesses jalgaon crime news)

त्यामुळे अंतर्गत धुसफूस वाढून शहर अस्वस्थतेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दंगल अथवा गुन्हेगारी रोखायची असेल तर अवैधधंद्यांना रोखणे गरजेचे झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अमळनेर शहर संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी आणि पुज्य साने गुरुजी यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते. शांत आणि संयमी शहर म्हणून अमळनेरची ओळख आहे. मात्र सध्या शहर व तालुक्यात काही प्रमाणात सट्टा, पत्ता, जुगार, झन्नामन्ना, सोरट, अवैध दारू आदी अवैधधंदे सुरू आहेत.

येणाऱ्या काळात १५ ऑगस्ट, गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे सण उत्सव लागोपाठ येणार आहेत. या सणामध्ये महिला व मुली मोठ्या संख्येने खरेदीसाठी आणि गणपती आरास नवरात्र उत्सवातील दांडियात सहभागी होण्यासाठी रात्री बाहेर पडतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Washout campaign soon due to law and order threat due to illegal businesses jalgaon crime news
Crime News: भररस्त्यात पत्रकाराला मारहाण; राऊत शिंदे गटावर भडकले, "हे कायद्याचे राज्य आहे का?"

त्यामुळे शहरात सुरू असलेल्या अवैधधंद्यामुळे महिला व मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या अवैधधंद्यांना आत्ताच रोखले नाही तर आगामी सण उत्सव धोक्यात येऊन शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा धोका वाढू शकतो. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी अवैधधंद्यांवर कारवाई सुरू केली असली तरी त्यात सातत्य ठेवण्याची गरज आहे.

पोलिसांची पाठ फिरली की अवैध धंदे पुन्हा सुरू होत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे. शहरातील गुन्हेगारीवर आणि अवैधधंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर पोलिस ठाणे अंतर्गत डीबी पथकाची नियुक्ती केली जाते. मात्र पथक निष्क्रिय झाले आहे की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

"शहरात अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढली असेल तर शहरात लवकरच ‘वॉश आउट’ मोहीम राबवली जाईल. यात कोणत्याही अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही." - सुनील नंदवाळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, अमळनेर

Washout campaign soon due to law and order threat due to illegal businesses jalgaon crime news
Jalgaon Fake Fertilizer News : उभ्या कपाशीवर फिरवला ‘रोटोव्हेटर’; बोगस खतामुळे शेतकऱ्याचे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.