Water Crisis : टंचाईची गावे अन्‌ टँकरही वाढले...! 18 गावात 20 टँकरने पाणीपुरवठा

water crisis
water crisisesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील तापमान ४७ अंशावर पोचले होते. दोन दिवसांपासून त्यात घट होऊन ४३ अंशापर्यंत आले आहे. अतितापमानामुळे आतापर्यंत सहा जणांचा उष्माघातसदृश तापाने मृत्यू झाला आहे. (water crisis 20 tankers are supplying water in 18 villages jalgaon news)

‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात वाढ होत असून, जमिनीतील पाणीपातळी खालावत आहे. सिंचन प्रकल्पातील जलसाठाही कमी होत आहे. आणखी ४ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. पूर्वी १४ गावांमध्ये १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता १८ गावांत २० टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

वाघूर धरण वगळता इतर धरणांतील साठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई जाणवेल. जिल्हाभरात उष्णतेची लाट जाणवत आहे. वाढत्या उन्हासोबत पाणीटंचाईचेही संकट जिल्हावासीयांवर ठाकले आहे. यंदा एक महिना उशिराने पावसाळा होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत.

जामनेर तालुक्यातील मोरगाव, रोटवद, किन्ही, नेरी दिगर येथे चार टँकर, भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा, वसंतवाडी दोन टँकर, बोदवड तालुक्यातील एनगाव एक टँकर, पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडा, खेडीढोक येथे दोन टँकर, चाळीसगाव तालुक्यातील मौजे पिंपळगाव, विसापूर, रोहिणी, अंधारी, हातगाव येथे ६ टँकर, भुसावळ तालुक्यातील कंडारी, कुऱ्हे प्र.न. दोन टँकर, पाचोरा तालुक्यातील रामेश्‍वर आणि लोहारा येथे तीन टँकर, अशा एकूण १८ गावांत २० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धरणांमध्ये ४० टक्के साठा

जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या गिरणा धरणातील साठाही गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी घटला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी गिरणा धरणात ३८.०१ टक्के साठा होता. यंदा मात्र त्यात घट झाल्याने तो आता २४.३० टक्के आहे.

धरणातील साठा असा

धरणाचे नाव--टक्के पाणी

हतनूर--५३.३३

गिरणा--२४.३०

वाघूर--६६.२९

मन्याड--१३.८३

भोकरबारी--१.९०

सुकी--६३.२३

water crisis
Gold Rate Hike : ‘गुरुपुष्यामृत’ योगावर होणार 2 हजारांच्या नोटांद्वारे खरेदी

अभोरा--६२.६६

अग्नावती--२.९४

तोंडापूर--४०.१७

हिवरा--१०.२९

मंगरूळ--४६.५१

बहुळा--२३.३९

मोर--६६.१६

अंजनी--२३.७३

गूळ--६६.१२

water crisis
Water Crisis : गंगापूर धरणात चर खोदणार! पाणीटंचाईच्या झळा; 12 टँकरने शहराला पाणीपुरवठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.