Jalgaon : भर पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती

A cleric distributing water from Noorani Masjid
A cleric distributing water from Noorani Masjidesakal
Updated on

जळगाव : तांत्रिक बिघाडामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. नागरीकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या घरात प्यायला पाणी नसताना सर्वच वार्डातील नगरसेवक नागरीकांना वाऱ्यावर सोडत गायब झाले आहेत. शहरातील संमिश्र लोकवस्ती असलेल्या गेंदालाल मिल, शिवाजीनगर, तांबापुरा मेहरुणसह शाहुनगरात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. (water crisis during rainy season Latest Jalgaon News)

A cleric distributing water from Noorani Masjid
‘PWD’च्या जाचाने ठेकेदार ‘बेजार’!; 2 वर्षांपासून देयके थकीत

शाहुनगर भागात तब्बल चार मातब्बर नगरसेवकांचा परिसर असताना तीन दिवस झाले एकाही नगरसेवकाने साधी भेट देत पाण्याची विचारपूस केली नाही. नागरिकांना थोडेफार वापरण्यापुरते पाणी मिळावे यासाठी नुरानी मशिदीचे मौलवी इम्रान हाफीज, मुतवल्ली याकूब बांगी यांनी सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास स्वतः बसून पाणी वाटप सुरु केले आहे.

A cleric distributing water from Noorani Masjid
‘PWD’च्या जाचाने ठेकेदार ‘बेजार’!; 2 वर्षांपासून देयके थकीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.