Jalgaon Water Shortage : 9 गावांना 10 टँकरने पाणीपुरवठा; गावांना तात्पुरती पाणीपुरवठा योजना

Water scarcity
Water scarcityesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील तापमानवाढीबरोबरच पाणीटंचाईच्या झळाही सुरू झाल्या आहेत. अतितापमानाने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. दुसरीकडे भूगर्भातील पाणीपातळी खालावत आहे. सध्या जिल्ह्यात नऊ गांवाना दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. (water is being supplied to 9 villages in district through 10 tankers jalgaon news)

जिल्ह्यात टंचाईग्रस्त भागासाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच दोन कोटी ४४ लाख ६९ हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पाणीटंचाईवर उपाययोजना सुरू आहेत.

टंचाईग्रस्त गावे व टँकरची संख्या अशी

* मोरगाव, रोटवद, नेरी दिगर (ता. जामनेर) - तीन

* तळबंदतांडा, वसंतवाडी (ता. भडगाव) - दोन

* एनगाव (ता. बोदवड) - एक

* हनुमंतखेडा, खेडीढोक (ता. पारोळा) - दोन

* मौजे पिंपळगाव (ता. चाळीसगाव) - दोन

* मौजे हातगाव भिल्ल वस्ती (ता. चाळीसगाव)

मौजे लोणवाडी बुद्रुक (ता. जळगाव) अशा दोन ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Water scarcity
Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयात 1 अधिकारी 6 पदे! पहिली घटना

जुलै, ऑगस्टमध्ये टंचाईची शक्यता

साधारणतः पाणीटंचाई आराखडा मार्च ते जूनपर्यंत तयार केला जातो. कारण जूनमध्ये पाऊस पडून पाणीटंचाई कमी होते, असे गृहीतक आहे. मात्र यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात वाढ होईल, सोबतच पावसाळाही लांबेल अशी चिन्हे आहेत.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खास बाब म्हणून एक कोटी ९७ लाख ९३ हजारांचा विशेष टंचाई आराखडा तयार करून ठेवला आहे. जूननंतर जर पाऊस झाला नाही तर या आराखड्यातील तरतुदीतून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे.

धरणातील पाणीसाठा असा

धरणाचे नाव -- यंदाचा पाणीसाठा टक्के -- २०२२ मधील जलसाठा

हतनूर -- ५३.०४ -- ५२.९४

गिरणा -- २९.२४ -- ४५.७८

वाघूर -- ७१.०४ -- ८०.२७

मन्याड -- १७.९८ -- २२.९२

बोरी -- ५.०१ -- १७.७८

Water scarcity
Jalgaon Bingo Circus : सर्कस मोजतेय अखेरच्या घटका...! डोलारा हाकताना मालकाची ‘कसरत’

भोकरबारी -- ३.२९ -- ३१.७१

सुकी -- ६७.९५ -- ६४.९५

अभोरा -- ६७.३२ -- ६५.६६

अग्नावती -- १६.५७ -- २६.१६

तोंडापूर -- ४७.५९ -- ४७.५९

हिवरा -- २१.९२ -- १७.९९

मंगरूळ -- ५२.४१ -- ४८.४६

बहुळा -- ३०.३४ -- ४३.६८

मोर -- ६९.६० -- ७०.१५

अंजनी -- ३३.३४ -- ४८.८०

गूळ -- ६९.९० -- ५९.२२

Water scarcity
Market Committee Election : बाजार समितीच्या मैदानात लोकसभा, विधानसभेची पेरणी; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()