Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात 33 टँकरद्वारे पाणीपुरवठा; धरणातील साठ्यात 6 टक्क्यांनी वाढ

 Water scarcity
Water scarcityesakal
Updated on

Jalgaon Water Scarcity : राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असले, तरी जळगाव जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने नद्या, नाल्यांना पूर आलेला नाही.

परिणामी, जिल्ह्यातील पाणीटंचाई अद्याप मिटलेली नाही. ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाई निवारणासाठी ७७ गावांमध्ये ८२ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. (water scarcity Water supply through 33 tankers in district jalgaon news)

जूनमध्ये केवळ ३६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत ८४.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यंदा निम्मे पर्जन्यमान घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने पाणीटंचाईच्या उपाययोजना सुरूच आहेत. जुलै सुरू झाला, तरीही समाधानकारक पाऊस नसल्याने ३१ गावांत ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

राज्यात सर्वत्र पावसाचे दमदार आगमन झाले. गेल्या गुरुवार (ता. ६)पासून शहरासह जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस होत आहेत. त्यावर शेतकऱ्यांनी ५४ टक्के पेरण्या केल्या. शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४४.८ टक्के पाऊस झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. अमळनेर व पारोळा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Water scarcity
Jalgaon Ajit Pawar : महायुतीच्या माध्यमातून जनतेच्या विकासाची कामे करा : अजित पवार

३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

जिल्ह्यात प्रामुख्याने ३१ गावांना ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्याचे नाव व गावे (कंसात टँकरची संख्या) अशी : जळगाव तालुका- २ गावे (२), जामनेर- १० गावे (८), भुसावळ- २ गावे (३), बोदवड- १ गाव (१), पाचोरा- ३ गावे (५), चाळीसगाव- ९ गावे (१०), भडगाव आणि पारोळा तालुक्यांतील प्रत्येकी दोन गावांना दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, ७६ गावांमधील ८१ विहिरींचे अधिग्रहण केले; तर दोन गावांना तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या आहेत.

धरणसाठ्यात वाढ

धरण क्षेत्रातही काही दिवसांपासून पाऊस होत असल्याने साठ्यात वाढ होऊ लागली आहे. गिरणा धरणात १९.२८ टक्के साठा असून, हतनूर ३८.८२ टक्के, वाघूर ५६.४१, सुकी १००.०, अभोरा १००, मंगरूळ १००, मोर ६८.७८, अग्नावती ००, हिवरा ४.४६, बहुळा १४.७७, तोंडापूर ३१.८९, अंजनी १२.९०, गूळ ६३.३८, भोकरबारी ००, बोरी ०० आणि मन्याड धरणात ६.५५ टक्के, असा एकूण ३९.८९ टक्के साठा शिल्लक आहे.

 Water scarcity
MP Unmesh Patil : पाडळसरेसाठी ‘सुप्रमा’ घेऊन केंद्राकडून निधी आणू : खासदार उन्मेष पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.