Jalgaon Water Scarcity : रणाईचे, तांड्यात कृत्रिम पाणीटंचाई; महिलांना गावाबाहेरून आणावे लागते पाणी

water scarcity Women and girls have to bring water from outside village with pots on their heads jalgaon news
water scarcity Women and girls have to bring water from outside village with pots on their heads jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon Water Scarcity : तालुक्यातील रणाईचे आणि तांडा दोन्ही गावांना तांत्रिक अडचणींमुळे पाणीटंचाई जाणवत आहे.

महिला व मुलींना गावाबाहेरून डोक्यावर हांडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. (water scarcity Women and girls have to bring water from outside village with pots on their heads jalgaon news)

तालुक्यातील रणाईचे आणि तांडा या दोन ग्रामपंचायती पूर्वी एकत्र होत्या. आता ग्रामपंचायती जरी स्वतंत्र झाल्या आहेत, परंतु पाणीपुरवठा योजना सामायिक आहे. रणाईचे गावाला निसर्डी येथील धरणावरून पाणी पुरवठा होत असतो. निसर्डी येथे ग्रामपंचयतींची विहीर आहे. उन्हाळ्यात निसर्डी धरणातले पाणी कमी झाले आहे.

त्यात तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे गावाला जेमतेम पाणीपुरवठा होत होता. दुष्काळात तेरावा महिना या उक्तीप्रमाणे जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनीसाठी जेसीबीने चारी खोदताना जुनी जलवाहिनी फुटली. फुटलेली जलवाहिनी जोडून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असताना त्यांनी जेमतेम जोडली आणि पुन्हा गळती सुरू झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

water scarcity Women and girls have to bring water from outside village with pots on their heads jalgaon news
Jalgaon Fraud News : धक्कादायक! लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोजवळ गेला अन... पायाखालची जमीनच सरकली...!

परिणामी, पाणी पुरेसे पोहचत नव्हते. पर्याय म्हणून तांड्यावरील बोअरवेल वापरली जात होती, पण तिची मोटर देखील जळाली होती. ती दुरुस्त करून देखील सुरू झाली नाही म्हणून पुन्हा काढण्यात आली आहे. त्यामुळे गावाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.

निसर्डी धरणावरून पाणी गावाच्या विहिरीच्या शेजारी खड्डयात टाकून सिंचनद्वारे ते विहिरीत जाते. पाणी नसल्याने गावातील महिला, लहान मुली गावाबाहेर असलेल्या आश्रमशाळा व माध्यमिक शाळेतील विहिरीवरून डोक्यावर हांडे ठेवून पाणी आणत आहेत. पाण्यासाठी महिलांचे श्रम आणि वेळ वाया जात आहे.

water scarcity Women and girls have to bring water from outside village with pots on their heads jalgaon news
Banana Crop Damage : रावेरला 2200 हेक्टरवरील केळी उद्ध्वस्त; वादळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.