Water Shortage : वरणगावात 10 दिवसांआड पाणीपुरवठा; शहरात कृत्रिम पाणीटंचाई

water shortage
water shortageesakal
Updated on

Jalgaon News : शहरासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नगरपालिकेच्या नियोजनाअभावी मूळ गावात १० ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. (Water supply every 10 days in Varangaon Artificial water scarcity in city jalgaon news)

पाण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागत आहे तर सामान्य कुटुंबीयांना विकत पाणी घेऊन गुजराण करावी लागत आहे. दुसरीकडे उपनगरांत दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतो तर मूळ गाव पाण्याविना वंचित का? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

शहराला येथून जवळच तपत कठोरा गावाजवळून तापी नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो. नदी पात्राजवळ पाऊस चांगला झाला किंवा नाही झाला तरी मध्यप्रदेश व विदर्भातून प्रवाहित नदीवरील हतनूर धरण प्रत्येक वर्षी कित्तेक वेळा ‘ओव्हरफ्लो’ होऊन पाणी पुढे सोडून द्यावे लागते.

त्यामुळे या धरणात पिण्यासाठी पाणीसाठा मुबलक उपलब्ध असतोच. त्या अनुषंगाने आरक्षित गावांना गरजेप्रमाणे धरणामधून पाणी सोडले जाते. असे असताना शहरात नागरिकांना २४ तास योजनेतून दररोज पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र सध्या शहराच्या उपनगरांमध्ये दोन दिवसांआड तर जुन्या गावात १० ते १५ दिवसांआड पाणी मिळत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

water shortage
Home Loan : अतिरिक्त खर्चाच्या बोजामुळे गृहकर्ज सामान्यांच्या आवाक्याबाहेर...

त्यामध्ये विजेचा लंपडाव असल्यास महिनाभर पाणी मिळत नाही. एकंदरीत शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध असताना केवळ नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

मागील काही वर्षांपूर्वी पाऊस कमी पडून धरण कोरडेठाक असताना नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसली नव्हती. पण गेल्या काही वर्षांपासून नगरपरिषदेच्या नियोजनाअभावी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात पाणी वाया जाऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांची नवीन समिती तयार केली आहे. मात्र तीही फक्त नावालाच आहे.

नगरपालिकेने पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व ठिकाणच्या जलवाहिन्यांची गळती काढणे आवश्यक आहे. कमीत कमी लिहिता, वाचता येईल अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती असावी, चार तास पुरवठ्याऐवजी दोन तास करावा. मात्र शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहचेल असे नियोजन करावे, इलेक्ट्रीक मोटर जळाल्यास किंवा वीजपुरवठ्यासंदर्भात काही अडचणी असल्यास स्वतंत्र फिडरचे व दुसऱ्या इलेक्ट्रीक मोटारचे नियोजन गरजेचे आहे.

water shortage
Jalgaon News : चोपडा शेतकी संघाच्या 10 जागा बिनविरोध; निवडणुकीतून शिंदे सेनेची माघार

पालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत शिक्षित व डिप्लोमा केलेले हुशार शहराची व पाणीपुरवठ्याची माहितगिरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. अल्पशिक्षित व काही अशिक्षित कर्मचारी काम करीत असल्याने अनेक अडचणी येतात. शिवाय, ते कर्मचारी खासगी ले-आऊटमध्ये पालिकेच्या नावाखाली स्वतःच्या माशिनद्वारे कामे करीत असल्याचे बोलले जाते आणि त्यांच्या भरवशावर पाणीपुरवठा विभागाचा गाडा सुरू आहे.

अवेळी पाणी, बिले मात्र भरमसाट

गेल्या कित्तेक वर्षांपासून शहरात दहा ते पंधरा दिवसांआड महिन्यातून दोन वेळा पाणीपुरवठा होत आहे. तर दुसरीकडे उपनगरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

काही ठिकाणी गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या असून, या उलट भरमसाट बिले आकारली जात असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

water shortage
Jalgaon News : बागायतदार आहे.. बागायदारीण पाहिजे! बागायतदाराचे अनोखे आंदोलन...

पाण्याच्या व्यवसायातून उलाढाल

पाणीपुरवठा कोलमडल्याचा फायदा घेत पाणीपुरवठा करणारे टॅंकरमागे हजार दोन रुपये घेत असल्याने सध्या पाण्याच्या व्यवसायातून मोठी उलाढाल होत आहे. गेल्या वर्षभरापासून पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांचा म्हणावा तसा धाक राहिला नाही, त्यामुळेच पाणीपुरवठ्याचे नियोजन, स्वच्छता, यासारख्या नागरी सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. कोणतीही तक्रार नोंदवली गेल्यास तिचे निराकरण होत नसल्याचेही सांगितले जात आहे.

"वरणगाव शहरात होणारा पाणीपुरवठा मुळगावात दहा आणि उपनगरात दोन दिवसांआड होत असेल तर योग्य ते नियोजन व अडचणी दूर करून नागरिकांना होणारा पाणीपुरवठा कमीत कमी दिवसांवर आणून वेळेत पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे." - विपुल साळुंखे, प्रभारी पाणीपुरवठा अभियंता, वरणगाव पालिका

water shortage
Mangalgrah Temple : मंगळग्रह मंदिरातील सोयीसुविधांनी अभिनेत्रीही भारावली...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()