Gulabrao Patil News : नाशिक विभागातील जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांना गती देऊन ती कामे मार्च २०२४ पर्यंत दर्जेदार व मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जे ठेकेदार काम करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी. त्रयस्थ तपासणी संस्थांनी पाणीपुरवठा योजनांच्या कामाची काटेकोरपणे तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. (Water Supply Minister Patil order to Take action against non working contractors jalgaon news )
नाशिक विभागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाच्या बाबतीत आढावा बैठक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथिगृह येथे झाली. त्या वेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधीक्षक अभियंता अजय सिंह, नाशिक विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
ठेकेदारांवर कारवाई करा
मंत्री पाटील म्हणाले, की नाशिक विभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ज्या पाणीपुरवठा योजनांच्या कामाला कार्यारंभ आदेश दिला नसेल, अशा कामांना तत्काळ कार्यारंभ आदेश देण्यात यावा.
ज्या गावातील पाणीपुरवठा योजनांना अडचणी असतील, त्यासाठी तेथील ग्रामसभेचा ठराव घेऊन निर्णय घ्यावा.
यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे. जे ठेकेदार काम करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी. त्रयस्थ तपासणी संस्थांनी पाणीपुरवठा योजनांच्या कामाची काटेकोरपणे तपासणी करावी आणि तपासणी अहवाल दर पंधरा दिवसांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करावा.
आदिवासी गावातील घरगुती नळजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ‘हर घर जल’ कामाची उद्दिष्टे २६ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी ग्रामसभा घेऊन ती उद्दिष्ट पूर्ण करावीत. शिल्लक निधी लवकरात लवकर खर्च करावा. या वेळी जळगाव ग्रामीण, धरणगावातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.