Sakal Impact : पाचोरा शहराला टँकरने पाणीपुरवठा सुरू

आमदार पाटील यांनी शनिवारी दुपारी आपल्या संपर्क कार्यालयात पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेशित केले.
Sakal Impact
Sakal Impactesakal
Updated on

Jalgaon News : 'पाचोरा शहरात पाणी टंचाईचे चटके असह्य' अशा आशयाचे वस्तुस्थितीवर आधारित वृत्त ‘सकाळ’ने शनिवारी (ता. १०) प्रसिद्ध केल्याने पालिका प्रशासन जागे झाले असून, आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी या वृत्ताची गांभीर्याने दखल घेतली.

आमदार पाटील यांनी शनिवारी दुपारी आपल्या संपर्क कार्यालयात पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेशित केले. त्यानुसार शनिवारी सायंकाळपासून टॅकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. (Water supply to Pachora city started by tanker sakal impact jalgaon news)

जिल्हाधिकाऱ्यांशी आमदार पाटील यांनी बोलणे केल्याने रविवारी (ता. ११) गिरणा धरणातून आवर्तनाचे पाणी सोडण्यात येणार आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे पत्र पाठवून गिरणा धरणातून तत्काळ आवर्तनाची मागणी केली आहे.

पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आमदार किशोर पाटील यांनी आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बाजार समिती सभापती गणेश पाटील, चंद्रकांत धनवडे, तालुकाप्रमुख सुनील पाटील, संजय कुमावत यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार पाटील यांनी स्पष्ट केले की , पाणीटंचाईबाबत तक्रारींची वृत्तपत्रांनी दखल घेतली आहे. आवर्तन सोडण्यासंदर्भात या अगोदरच संबंधित यंत्रणेशी बोलणे झाले आहे. परंतु जामदा धरणाच्या भिंतीला तडा गेल्याने तेथे काम सुरू असल्याने आवर्तन सोडण्यास विलंब केला जात होता.

त्यासाठी आणखी आठ दिवसांचा अवधी लागेल, असे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले. परंतु शहरातील पाणीटंचाई पाहता व नागरिकांचे होणारे हाल पाहता त्वरित आवर्तन सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याने रविवारी (ता. ११) सकाळी सहाला गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे.

Sakal Impact
Jalgaon News : लसणाला आले 'अच्छे दिन...'

पाणी पोहोचण्यास पाच ते सहा दिवसांचा अवधी लागणार असून, या काळात नागरिकांना पालिकेतर्फे १५ टँकरद्वारे प्रभागनिहाय पाणीपुरवठा करण्यासंदर्भात आदेशित केले असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

‘गिरणा’तून आवर्तन सोडणार : पाटील

‘सकाळ’मधून पाणीटंचाई संदर्भात नागरिकांचे होणारे हाल व पाणीपुरवठ्याची परिस्थिती या संदर्भातील वस्तुनिष्ठ सविस्तर वृत्त शनिवारच्या अंकात प्रसिद्ध झाले. त्या वृत्ताची दखल घेऊन आमदार किशोर पाटील यांनी शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात पालिका अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली व गिरणा धरणातून आवर्तनाचे पाणी सोडण्या संदर्भात जिल्हाधिकारी व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून टंचाईचा प्रश्न गांभीर्याने मांडला.

त्वरित आवर्तन सोडण्याचे आदेशित केल्याने रविवारी (ता. ११) सकाळी गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बहुळाचे पाणी वापरायोग्य नाही : वाघ

माजी आमदार दिलीप वाघ यांनी शनिवारी सायंकाळी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन पाणीटंचाई संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करून पिण्याच्या पाण्यासह गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. बहुळा धरणातून पाणीपुरवठ्याची योजना त्यावेळी झाली.

कदाचित आताही ती सुरू होईल. परंतु ते पाणी वापरण्यायोग्य नसल्याचे दिलीप वाघ यांनी सांगितले. या वेळी प्रा. भागवत महालपुरे, शिवदास पाटील, गोपी पाटील, राज जगताप उपस्थित होते.

Sakal Impact
Jalgaon Municipality News : उपायुक्तापासून थेट नगररचना,बांधकाम विभागावर संक्रांत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.