Jalgaon Water Cut : जामनेरवासियांना आता पाचव्या दिवशी पाणी

Water supply will be cut off in some parts of Kolhapur on Monday
Water supply will be cut off in some parts of Kolhapur on Monday
Updated on

Jalgaon Water Cut : शहरवासीयांच्या अडचणीत आगामी निवडणुकांच्या काही महीने आधीच दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असुन, त्यात आता पिण्याच्या पाण्यासाठी पाचवा दिवस उजाडणार आहे. (water supply will be done on 5th day jamner jalgaon news)

संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन पालीका प्रशासनातर्फे याबाबत शहरवासीयांना ध्वनीक्षेपकाद्वारे सुचना देण्यात येत आहेत. त्यानुसार, चौथ्या दिवशी करण्यात येणारा पाणी पुरवठा रविवार (ता. ३)पासुन पाचव्या दिवशी करण्यात येईल.

गेल्या महिनाभरापासुन पावसाने चांगलीच दडी मारल्याने जलस्रोतांमधील पाणीसाठ्यात घट झाली. धरणे- तलाव तर सोडाच; नद्या-नाल्यांनाही भरून वाहण्याचे भाग्य लाभले नाही. परिणामी, शहरासह तालुकाभरातील जलसाठे अपवाद वगळता कोरडेठाक होण्याची परिस्थिती उद्‌भवू लागली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water supply will be cut off in some parts of Kolhapur on Monday
Maharashtra Drought News : हक्काच्या पाण्यासाठी राजकारण्यांची आश्वासने ; पाण्याअभावी शेतकरी मात्र हतबल

दुसरीकडे शेती पीकेही अत्यल्प प्रमाणातील पावसावर आतापर्यंत कसेतरी तग धरून आहेत. शिवाय पिकांना ऐन वेळी पाणीच मिळाले नसल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हे कमी की काय, एक महीनाच कसाबसा पावसाळा बाकी असताना पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आता शहरवासीयांना चौथ्या दिवसाऐवजी पाचव्या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे.

Water supply will be cut off in some parts of Kolhapur on Monday
Jalgaon Drought News : पावसाअभावी कोरडवाहू खरीप धोक्यात! कोरड्या दुष्काळाचे सावट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.