Wedding Season : चाळीसगावातील मंगल कार्यालये हाऊसफुल्ल...! व्यावसायिकांना सुगीचे दिवस

wedding season
wedding seasonesakal
Updated on

Jalgaon News : यंदा एप्रिल महिन्यात गुरु लोप असल्यामुळे विवाहाचे मुहूर्त नव्हते. मात्र मे महिन्यात धुमधडाक्यात पहिल्या आठवड्यापासून विवाह सोहळ्यांना सुरवात झाली आहे. (wedding halls in Chalisgaon are housefull jalgaon news)

एक-दोन दिवसाआड दुपारी व गोरज मूहर्तावर तिथी असल्यामुळे एका दिवशी अनेक विवाहांना उपस्थिती लावण्यासाठी वऱ्हाडी मंडळींची धावपळ उडत आहे. विवाहमुळे मे महिन्यात सर्व व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.

तर दुसरीकडे शहरासह आजूबाजूच्या परिसरातील खासगी मंगल कार्यालये तसेच लॉन्सचे बुकिंग देखील फुल्ल झालेले दिसून येत आहेत. लग्न सोहळा दोन कुटुंबाच्या मनोमिलनाच्या आणि स्वर्गातच गाठी बांधलेल्या जोडीदारांना एकत्र आणणारा क्षण मानला जातो. विवाह जुळल्यावर अनेक वस्तू खरेदीला प्रथम प्राधान्य दिले जाते.

लग्नातिथी मे महिन्यात दाट असल्याने या विवाह सोहळ्यावर अवलंबून असणाऱ्या स्वयंपाक, वाढपी, ते बँड, घोडा, सजावट, हार- गुच्छ ते इतर सर्व बाबी लॉन्स आणि मंगल कार्यालयात पॅकेज स्वरूपात उपलब्ध झाल्या आहेत.

ज्या नियोजित वधू-वरांच्या पालकांचे बजेट हे ३०० ते ५०० लोकांचे असते, ते साधारणत: शहरातीलच मंगल कार्यालयांना प्राधान्य देतात. मात्र, ज्यांचे बिग बजेट अर्थात हजारावर असते, ते कुटुबीय आजूबाजूच्या परिसरातील लॉन्सला प्राधान्य देतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

wedding season
Sakal Exclusive : राज्यातील शिक्षकांना 'या' स्पर्धेद्वारे साडेदहा कोटी रुपयांची बक्षीसे जिंकण्याची संधी!

यंदा विवाह सोहळ्यांच्या खर्चातही १० ते १५ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बँड, मजूर, मंडप, आचारी, वाढपी या सगळ्याचे बजेट वाढल्याचे दिसत आहे. दोन वर्षें कोरोना महामारीमुळे समारंभांवर बंदी आली होती.

त्यामुळे त्याच्याशी संबंधित अनेक व्यवसाय डबघाईस आल्याचे पाहायला मिळाले. मंगल कार्यालयांमध्ये ५० जणांच्या उपस्थितीचे नियम लादण्यात आले होते. त्यामुळे कमी खर्चात विवाह पार पडले. आता थाटामाटात विवाह सोहळे पार पाडता येणार असल्याने कार्यालय व लॉन्स बुकिंगसाठी कसरत करावी लागते.

कमी लोकांच्या उपस्थितीत चांगल्या हॉटेलमध्ये विवाह करण्याकडे सुद्धा मुलामुलींच्या वडिलांचा कल दिसून येत आहे. त्यासाठी शिर्डी, औरंगाबाद, धुळे, नाशिक या शहराची निवड केली जात आहे. त्यासाठी २०० ते ३०० जणांच्या उपस्थितीत हॉटेल मालकांकडून पॅकेज आकरण्यात येते. त्यामुळे एकाच छताखाली सर्व गोष्टी मिळाव्यात, अशी अपेक्षा असते.

wedding season
Jalgaon News : आयुष्याची शतकोत्तरी खेळी, कुटुंबही एकसंघ! गायकवाड यांच्या संस्काराची शिदोरी

शहरात लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय, पाटीदार समाज मंगल कार्यालय, भूषण व न्यू भूषण मंगल कार्यालय, वैभव मंगल कार्यालय, भाग्यलक्ष्मी मंगल गणेश मंगल कार्यालय, स्वयंवर मंगल कार्यालय, श्रीकृष्ण मंगल कार्यालय, आर. के. मंगल कार्यालय, पूर्णपात्रे लॉन्स अशा प्रकारची विविध मंगल कार्यालये आहेत. तर शहरापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेले कमलशांती, गणपती लॉन्स, सिद्धिविनायक लाँन्स, विराम लॉन्स, बालाजी लॉन्स, अशा प्रकारची लॉन्स आहेत.

‘लॉन्स’लाही वाढती मागणी

विवाह सोहळ्यांमुळे व्यावसायिकांच्या व्यवसायाला बूस्ट मिळाला आहे. परगावी वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी क्रुझरला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. दाट तिथींमुळे लग्नासाठी महिन्याआधी लॉन्स, मंगल कार्यालये हाऊसफुल्ल झाले आहेत.

मे महिन्यात सुट्ट्या असल्यामुळे विवाहासाठी शासकीयसह सर्व खासगी कर्मचाऱ्यांची धावपळ होत आहे. उन्हामुळे महिला, लहान मुले ,ज्येष्ठ नागरिक यांचा विचार करून अनेक विवाह गोरज मुहूर्तावर होत आहेत. बऱ्याचदा ग्रामीण भागात भारनियमनाचे संकट येण्याची शक्यता असते. वेळेअभावी ग्रामीण भागात एका दिवसात हळद, मेंहदी, मांडव असे विवाह होत आहेत.

wedding season
Sakal Impact : अखेर विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा विधी पुढे ढकलला.... या तारखेपासुन परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.