Mansoon Fruit Precaution : पावसाळ्यात आजारांवर ‘फलाहार’ गुणकारी; या फळांचा करा आहारात समावेश

Fruits
Fruitsesakal
Updated on

Mansoon Season Precaution : पावसाला सुरवात होताच गरमागरम भजी, कडक चहा पिण्याची ओढ अनेकांना लागते. पण, या दिवसांमध्ये आहारदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. पावसाळ्यात पचनक्रिया मंद होत असल्याने योग्य आहाराबरोबरच चांगली फळे खाणेदेखील आवश्यक असते.

कारण विविध आजारांवर रामबाण उपाय असलेली फळे खाल्ल्याने लहान मुलांपासून मोठ्यांचे आरोग्य चांगले राहते. पावसाळा सुरू झाल्याने पावसाळी फळे बाजारात दाखल झाली आहे. त्यांना मागणी वाढली आहे. (which fruit eat in monsoon article jalgaon news)

पावसाळ्यात काही विशेष फळे बाजारात येत असतात. ही फळे फक्त पावसाळ्यापुरती मर्यादित असल्याने त्यांचा आस्वाद घेतला पाहिजे. त्यात अनेक फळे ही गंभीर आजारांवर मात करत असतात. केळी, जांभूळ, आलूबुखारा, डाळींब, लिची, नासपती, चेरी ही फळे पावसाळ्यामध्ये मिळतात. सफरचंद, द्राक्ष, केळी, स्ट्रॉबरीसारखी ऋतुमानानुसार बाजारात उपलब्ध होणारी फळे खाल्ल्याने त्यांचा उपयोग गंभीर आजारांवर होतो.

उस : उन्हाळ्यात उसाला, तसेच ऊसाच्या रसाला जास्त मागणी असते. शरीराला थंडावा मिळतो. तसेच, कावीळ झाल्यास ऊसासारखे दुसरे औषध नाही. कावीळ झालेल्या व्यक्तीने जेवणापूर्वी दोन वेळा ऊस खावा. चार-पाच दिवसात कावीळ निघून जाते.

आलूबुखार : हे आंबट गोड चवीचे फळ आहे. पावसाळ्यात अनेकांना पोटाशी संबंधित आजार होतात. आलूबुखार खाल्ल्याने इंफेक्शन आणि पोटाशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते. रोज आलूबुखारा खाल्ल्याने ॲंटी ऑक्सिडेंटमुळे होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fruits
Harmful Fruit Combinations: पपईसोबत चुकूनही खाऊ नका लिंबू, नाहीतर होतात हे गंभीर साईड इफेक्ट्स

डाळिंब : बाजारात बाराही महिने उपलब्ध असलेल्या डाळिंबाला पावसाळ्यात अधिक महत्त्व असते. आजारांपासून बचाव करण्यासाठी रोज डाळिंब खाल्ले पाहिजे. फायबर आणि व्हिटॅमिनयुक्त असलेल्या डाळिंबाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित तक्रारी दूर होण्यास मदत होते. डाळिंबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते, अपचन दूर होते. कावीळ झाली असल्यास डाळिंबाचा उपयोग केला जातो.

स्ट्रॉबेरी : स्ट्राबेरी रक्त वाढीसाठी अर्थात्‌ पंडुरोग किंवा अनिमियामध्ये लोहाबरोबरच स्ट्रॉबेरीचा वापर केल्यास लोहाच्या औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात. छाती धडधडणे, भीती वाटणे, आत्मविश्‍वासाचा अभाव, थोड्या कामाने थकवा येणे, अशा वेळी स्ट्रॉबेरी हा उत्तम पर्याय आहे.

पपई : पपई रोज खाल्ल्यास उत्तम आहे. अन्न पचते, जंतावर रामबाण औषध आहे. पपईचा चीक हा खरुज, नायटा अशा त्वचारोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो. पपईचा चीक आणि मध दोन चमचे एकत्र करून त्यात कोमट पाणी घालून लहान मुलांना अर्धा चमचा दोन वेळा दिल्यास जंत पडून जातात.

अंजीर : हे फळ उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये उपलब्ध असते. अंजीर खाल्ल्याने बौद्धिक व शारीरिक थकवा दूर होतो. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमित खावीत. यामुळे मूत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचा रस खाल्ल्याने परिणाम होतो.

Fruits
ही आहेत जगातील सगळ्यात Healthy Fruits आजपासूनच करा खायला सुरुवात

जांभूळ : जांभूळ हे पावसाळ्याच्या दिवसांतच खायला मिळते. इतर दिवसांमध्ये ते मिळत नाही. जांभूळ खाणे शरीरासाठी खूपच फायद्याचे आहे. जांभळात आयर्न, पोटॅशिअम, फोलेट आणि व्हिटामिनची मात्रा मोठ्या प्रमाणात असते.

आंबा : फळांचा राजा आंबा उन्हाळ्यात सर्वाधिक तयार होतो. आंबा हे शक्तिवर्धक फळ आहे. अन्नाबद्दल रुची, भूक वाढवण्यासाठी उत्तम आहे. शरीराची आग होत असल्यास आंबा उपयुक्त ठरतो. आंब्याच्या सालीचा काढा करून, त्यातील कोय भाजून तिचे चूर्ण करून मधात दिल्यास लहान मुलांचा अतिसार दूर होतो.

नासपती : फायबरयुक्त असलेले नासपती हे फळ खूपच गोड आणि मधुर आहे. हे फळ खाल्ल्याने मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले होते. यात अँटी ऑक्सिडेंट्सची मात्रा जास्त असते. वजन कमी करण्यासाठीही याचा वापर केला जातो. नासपतीने कर्करोग, हायपरटेंशन, डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.

पीच : पीच हे फळ महाग आहे. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सनी पीच हे भरलेले असते. या फळाची चव नीम गोड असते. या फळामुळे हृदयविकार नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. पचनशक्ती वाढवणे, अॅलर्जी कमी करणे आणि त्वचा सुधारण्याचे काम पीच करते.

Fruits
Healthy Fruits : हृदयाच्या आरोग्यासाठी ही फळं खा, ठणठणीत राहाल

केळी : हे शक्तिवर्धक फळ असून, पचण्यास जड असते. केळी खाल्ल्याने वजन वाढते. थंड असल्यामुळे अंगाची आग कमी करते. वारंवार पित्त होण्याची तक्रार असेल, तर केळ खाल्ल्याने जास्त उपयोग होतो. आहारात एक दोन केळींचा समावेश केल्यास शरीराला फायदा होतो.

आवळा : आवळा हे फळ बहुगुणी आहे. मुख्यत: पित्त होण्याची तक्रार असेल, तर चमचाभर जिरे, खडीसाखर एकत्र करून हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी उपयोग होतो. लघवीच्या विकारावर हे परिणामकारक औषध आहे. आवळा, खडीसाखर एकत्र करून घेतल्याने लघवी साफ होते.

चेरी : या फळाचे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सेवन करणे चांगले समजले जाते. व्हिटामिन ए, बी, सी, बीटा कैरोटीन, कॅल्शिअम, आयर्न आणि पोटॅशिअमयुक्त असे हे फळ आहे. यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. व्हिटामिन ‘सी’चे प्रमाण चेरीमध्ये अधिक असल्याने संसर्गापासून बचाव होतो.

Fruits
Fruits For Weight Loss: जीममध्ये न जाताच 'ही' फळं खाल्ल्याने Belly Fat होईल कमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.