Jalgaon : निसर्गटेकडी परिसरात वन्यप्राण्यांचा अधिवास

Nature Mountain
Nature Mountainesakal
Updated on

चाळीसगाव : गर्द वनराई अन् हिरवाईने नटलेला परिसर, असे आल्हाददायक वातावरण असलेल्या ब्राह्मणशेवगे येथील ‘निसर्गटेकडी' परिसरात वनप्राण्यांचा अधिवास दिवसेंदिवस वाढत असून, पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या ठिकाणी पर्यटकांना दररोज हरणांच्या कळपासह मोरांचा थुईथुयाट पाहायला मिळत आहे. हे मनोहारी दृष्टी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी वाढू लागली आहे.

ब्राम्हणशेवगे शिवारात गेल्या सात वर्षांपासून लोकसहभागातून नाला खोलीकरणासह जलसंधारणाची कामे सुरू आहेत. गुणवंत सोनवणे यांच्या संकल्पनेतील "‘एक गाव एक तलाव' अभियानांतर्गत अभिनव उपक्रम करण्यात येत आहे.

यामुळे संपूर्ण गाव जलसमृद्ध झाले आहे. त्यात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने शेतकरी चिंतामुक्त झाला आहे. रब्बी, खरीप व उन्हाळी असे तिहेरी पीक तो घेऊ लागला आहे. तत्पूर्वी येथील पडिक व ओसाड टेकडी अर्थात निसर्गटेकडी परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी यांच्या पुढाकाराने मागील वर्षी तेरा हेक्टर व चालू वर्षी दहा हेक्टर पडिक जमिनीवर २५ हजार झाडांचे रोपण करण्यात आले आहे.(wild animal arrived at Nisarg Tekdi area in Chalisgaon jalgaon news)

Nature Mountain
थकीत गाळेधारकांनी २५ टक्के रक्कम भरावी महापालिकेचे आदेश; अन्यथा जप्तीची कारवाई

त्यापूर्वी सेवा सहयोग फाऊंडेशन (पुणे) व वेंडर लाइन कंपनीच्या वतीने गुणवंत सोनवणे यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव एक तलाव' अभियानांतर्गत तलाव निर्माण करण्यात आला आहे. तसेच येथील झाडांना उन्हाळ्यात पाणी देता यावे, यासाठी चार कूपनलिका करण्यात आल्या आहेत.

निसर्गटेकडी परिसरात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे व वरराई बहरल्याने हरीण, रानडुक्कर, ससे, कोल्हे, लांडगे तसेच पाण्यातील परदेशी पक्षी, बगळे, पाणकोंबड्या व धीवर पक्षी, गरुड, घार, टिटवी, चिमण्या आदी पक्ष्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

- सोमनाथ माळी,

पर्यावरणप्रेमी

Nature Mountain
सावधान! रात्री उशीरा जेवण करताय...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()