Jalgaon Municipal Corporation : गुदाम उभारण्यासाठी मनपानेच मोडले नियम! ॲड शुचिता हाडा यांचा आरोप

jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporationesakal
Updated on

जळगाव : इमारतीच्या आवारात गुदाम किंवा काही बांधायचे असल्यास महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते. (without permission started work of godown in municipal Accusation by corporator jalgaon news)

मात्र, महापालिकेने आपल्या सतरा मजली इमारतीमागील बाजूस गुदाम उभारण्यासाठी नगररचना व बांधकाम विभागाची कोणीही परवानगी न घेता काम सुरू केले आहे, असा आरोप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी केला आहे.

महापालिकेच्या सतरा मजली इमारतीमागील बाजूस लोखंडी ॲंगल लाऊन वर पत्रे टाकून गुदाम उभारण्यात येत आहे. याबाबत भाजपच्या नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी सांगितले, की सतरा मजली इमारतीच्या विद्रुपीकरणाचा हा प्रयत्नर आहेच. मात्र, ही गंभीर बाब आहे. सतरा मजली परिसरात दुर्दैवाने आगीची घटना घडल्यास वाहन कसे जाणार, याचाही विचार करण्यात आलेला नाही.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

jalgaon municipal corporation
Jalgaon News : जेवणाला जातोय सांगून गेला अन् घरी परतलाच नाही...

विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या इमारतीच्या परिसरात बांधकाम करावयाचे असल्यास महापालिकेच्या नगररचना व बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते.

मात्र, महापालिकेला याची आवश्‍यकता वाटत नाही का? महापालिकाच नियमांचा भंग करीत असेल, तर सर्वसामान्यांना नियमांचा बाऊ का केला जातो, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेकडे अनेक जागा असताना, तसेच सुरक्षेसाठी मक्ता दिलेला असतानाही महापालिकेच्या आवारातच जप्त करून आणलेल्या टपऱ्याचे गुदाम उभारण्यात का येत आहे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.

jalgaon municipal corporation
Jalgaon News : कासमवाडी-लक्ष्मीनगर रस्त्याचे मक्तेदाराकडून निकृष्ट काम; मुरूमाऐवजी चक्क 'याचा' वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.